आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट येथे दिनांक 12 जून 2025 रोजी
जन आरोग्य समितीचे बैठक घेण्यात आली, यावेळी माननीय तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीमध्ये जन आरोग्य समितीचे सदस्या मा. सौ. सुनिता ताई पाटील पंचायत समिती तुळजापूर सदस्य, जळकोट ग्रामपंचायत सरपंच श्री.गजेंद्र कदम, उपकेंद्र सलगरा येथील JAS अध्यक्ष सरपंच,श्री विलास पाटील,ग्रा.पंचायत सदस्य श्री महेश कदम व इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीमध्ये डॉ लक्ष्मण कुंडले प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांनी प्रस्ताविक व प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा विषयी माहिती दिली,त्यानंतर मा.तालुका आरोग्य अधिकारी तुळजापूर ,डॉक्टर रफिक अन्सारी यांनी गुणवत्ता सुधार,सुविधा परीक्षण ( स्वच्छ पाणी,वीज,सुरक्षा, स्वच्छता इ), हेल्थ प्रमोशन,आपत्कालीन सुविधा,इमारत किरकोळ दुरुस्ती, रुग्ण सहाय्य इ.साठी आवश्यक वित्तीय तरतूद व त्याचा उपयोग,तसेच प्रा.आ.केंद्र मार्फत राबवले जाणारे उपक्रम ,सुधारणाविषयक कामे व उत्तम सुविधा यांची माहिती, तक्रार निवारण,समुदाय प्रतिसाद,व सुधारात्मक कार्याची,NQAS,VHNSND,National Programs, Health benefits,सर्व शासकीय योजना इ मध्येलोक सहभाग, यासह अनेक बाबींवर विश्लेषण व सकारात्मक चर्चा घडवून आणली, तसेच वैद्यकीय सेवांमध्ये लोक सहभागासाठी स्थानिक प्रतिनिधींना आवाहन केले, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कीटक शास्त्रज्ञ डॉ कोकाटे व PHC सुपरवायझर श्री शहाजी आवटे यांनी सात रोग प्रतिबंधात्मक कार्यवाही तसेच जलद ताप व कीटक शास्त्रीय सर्वेक्षण इत्यादी बद्दल माहिती दिली, तसेच प्राथमिक आरोग्य आणि रात्री सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा व केले जाणाऱ्या कार्याची माहिती दिली, या बैठकीत सदस्य माननीय महेश कदम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जन आरोग्य समितीचे सदस्य व गावातील नागरिक यांच्यातील समन्वय राखून उत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्यात याव्यात अशा प्रकारे सूचना केल्या व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामाबद्दल समाधान असल्याचे व्यक्त केले, गोळेगाव येथील सरपंच श्री विलास पाटील यांनीही केंद्रातर्फे व उपकेंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले व आवश्यक सूचना केल्या,तसेच
सदस्यांनी काही तक्रारी व सुधारणात्मक वैद्यकीय सुविधा देण्यासंदर्भात नवीन सूचना केल्या,ज्या समन्वयातून सोडविण्यावर भर देण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कुंडले डॉक्टर रोहित कवठे डॉ. अक्षय पवार, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नाजिया शेख, सुपरवायझर श्री एम एफ पठाण, आरोग्य सहायिका सौ उकिरडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री ताहीर सरवदे,श्री मस्के कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सेवक श्री हसुरे, श्री जगताप श्री मोगरकर, व इतर कर्मचारी उपस्थित होते.