spot_img
spot_img
spot_img

बसव प्रतिष्ठाच्या वतीने केंद्रीय प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप….

 

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

उमरगा तालुक्यातील मुरूम येथे बसव प्रतिष्ठाण अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने दि. १६ वार सोमवार रोजी शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधुन शाळेच्या पहिल्या दिवशीच १ली ते ४थी च्या ५० गरजू विद्यार्थ्यांना शाळे साठी लागणाऱ्या सर्व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, माजी नगर सेवक सुरेश शेळके,अनंत लोखंडे, पालक हुसेन तांबोळी, दिगंबर सोनटक्के, बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे आदींची प्रमुख उपस्थिती होती, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आला. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पासून वंचित असतात आणि त्यामुळे ते शिक्षणापासून दूर जायला लागतात अशा विद्यार्थ्यांना पाठबळ मिळावे या उद्धात हेतूने बसव प्रतिष्ठाण च्या माध्यमातून सातत्याने शालेय उपयोगी कार्यक्रम राबविले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले असल्याचे मत अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी मांडले. याप्रसंगी शालेय पालक समिती जैरुबीना मुल्ला,सोनाली जाधव, पालक प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.बोईनवाड अशोक,माने शैलजा,हुल्ले सुनंदा,हिरेमठ मेघादेवी आदिनी परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या