वागदरी (एस.के. गायकवाड):
भेटी लागे जीवा,मुखी हरी नाम घ्याव, पाऊले चालती पंढरीची वाट,विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असे नामस्मरण करित पंढरपूर येथील विठ्ठलाच्या भेटी साठी पुणे येथून निघालेल्य संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यचे मनमोहक चित्रीकरण हडपसर पुणे येथे सध्या वास्तव्यास असलेले वागदरी ता.तुळजापूर येथिल सुपूत्र प्रविण श्रीरंग वाघमारे यानी केले असून ते भाविक भक्तासाठी आणि जनतेसाठी लक्षवेधी ठरले आहे.
वागदरी ता.तुळजापूर येथिल प्रविण वाघमारे हे कामानिमित्ताने आपल्या कुटूंबासह हडपसर पुणे येथे राहतात.त्याना फोटो चित्रीकरणाचा छंद जडला या छंदाचे रूपांतर व्यवसायात होऊन त्यानी फोटो स्टूडीओचा व्यवसाय सुरू केला.छोट्या मोठ्या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे व प्रसंगी दिगदर्शनाचे काम ही ते करतात.ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्याचा त्यांचा मोठा हातखंड आहे. ड्रोन केमेराद्वारे ते उत्कृष्ठ व्हिडीयो सुटिंग आणि फोटो काढतात.
प्रति वर्षा प्रमाणे आषाढी वारी निमित्ताने देहूगाव पुणे येथून निघणाऱ्या श्री संत जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी मध्ये ते मनोभावे सहभागी होऊन वरवंटच्या दिशेने पंढरपूरकडे मार्गस्थ होणारी संत तुकोबारायाची पालखी चौफुला चौकात विसावली असता प्रविण वाघमारे यानी ड्रोन कॅमेराद्वारे केलेले पालखीचे मनमोहक चित्रीकरण लक्षवेधी ठरले असून त्यानी केलेल्या या चित्रीकरणा बदल वागदरी ग्रामस्थातून व मित्र परिवारातून समाधान व्यक्त केले जात आहे






