वागदरी (एस.के.गायकवाड) :- हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती नळदुर्ग येथे विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली .
नळदुर्ग येथील वसंतराव नाईक गोलाई चौकात नियोजित वसंतराव नाईक स्मारकाच्या ठिकाणी हरित क्रांतीचे प्रणेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त बंजारा समाज बांधवांच्या वतीने अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून शांततेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी भाजपाचे युवा नेते मल्हार दादा पाटील यांनीही उपस्थित मान्यवरांच्या समवेत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल.
तसेच येथील वसंतनगर येथे स्वर्गीय वसंतराव नाईक याच्या जयंतीचे औचित्य साधून वसंतराव नाईक जयंती उत्सव कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केले.तर भाजपाचे युवा नेते मल्हार दादा पाटील यांनी देखील रक्तदान शिबिरास भेटी देऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण , जीपचे माजी सदस्य तथा भाजपाचे नेते दिपक आलूरे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.आशिष सोनटक्के,भाजपाचे दत्ता राजमाने , तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य विलास राठोड, प्रविण पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे हरीष जाधव , आश्रम शाळेचे अध्यक्ष वैभव जाधव, कैलास चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण , वसंत पवार, शिवाजी चव्हाण , मोतीराम राठोड,एम.पी.राठोड , महेश चव्हाण,जयंती कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण,सचिव दत्ता राठोड,कार्याध्यक्ष सुरेश राठोड,कोषाध्यक्ष सचिन राठोड, मिरवणूक प्रमुख सुशील राठोड, रवि महाराज, माजी नगरसेविका छिमाबाई राठोड,भाजपाचे धिमाजी घुगे , साहेबराव घुगे ,पद्माकर घोडके,श्रमिक पोतदार,किशोर धुमाळ,पाडूरंग पुदाले ,रिपाइं(आठवले)चे एस. के.गायकवाड,गणेश राठोड , अमरजीत पवार, विष्णू जाधव सह बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .