spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग शहरात भागवत सप्ताहाचे आयोजन 

 

५२ वर्षापासुन अखंडनाम सप्ताह अंहकारी परिवारातर्फे राबविला जातो .

नळदुर्ग (दादासाहेब बनसोडे )

प्रतिवर्षाप्रमाणे नळदुर्ग शहरात गेल्या ५२ वर्षांपासून सुरु असलेली भागवत सप्ताहाची परंपरा यावर्षीही संपन्न होणार आहे..

नळदुर्ग येथील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव अहंकारी गुरुजी यांच्या निवासस्थानी दिनांक ४ जुलै ते १० जुलै या दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे..

अहंकारी परिवाराकडून मागील ५२ वर्षांपासून हा भागवत सप्ताह अखंडपणे सुरु आहे..

या सात दिवसात वे.शा.सं.श्रीराम जोशी महाराज ( केज ) यांच्या अमृतवाणीने भागवत कथा सांगितली जाते..

४ जुलै पासून सुरु होणाऱ्या या सप्ताह मध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात.. दिनांक ६ जुलैला आषाढी एकादशी, ८ जुलैला गोवर्धन काला, ९ जुलैला श्रीकृष्ण – सुदामा भेट सुदाम्याचे पोहे तर १० जुलैला गुरुपौर्णिमाला समाप्ती असते.. यावेळी पाद्यपूजा केली जाते त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते..

तरी या भागवत सप्ताहासाठी सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती

श्री.बाबुराव – सौ.जयश्री बाबुराव अहंकारी.श्री. वसंतराव – सौ.वनमाला वसंतराव अहंकारी..श्री. बळवंत – सौ.माधुरी बळवंत अहंकारी..श्री. अनंत – सौ.संध्या अनंत अहंकारी..श्री. विकास – सौ.अश्वीनी विकास अहंकारी..श्री. वैभव – सौ.वर्षा वैभव अहंकारी.श्री.योगेश – सौ. अदिती योगेश अहंकारी, श्री. सुनिल पाटील यांच्यासह अहंकारी परिवाराकडून विनंती करण्यात आली आहे..

Related Articles

ताज्या बातम्या