वागदरी ( एस. के. गायकवाड ):
तथागत भगवान गौतम बुद्धानी बौध्द धम्माच्या माध्यतुन संबध मानवाला कर्मकांड मुक्त समाधानाने जिवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे.म्हणूनचं महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी बहुजनाना कर्मकांड मुक्त आनंददायी जीवन जगण्याकरिता बौद्ध धम्म दिला आहे.तेंव्हा तथागतानी सांगीतलेल्या आर्य अष्टांगीक मार्गाचा अवलंब करून मानवाने सुखी समाधानाने आनंदी जीवन जगले पाहीजे.असा उपदेश पूज्य भन्ते आनंदबोधी महाथेरो (नागपूर ) यानी वागदरी ता. तुळजापूर येथे आयोजित धम्मदेशाना ( प्रवचन ) कार्यक्रमात केला.
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील पंचशील बुद्ध विहारात दि.२ जुलै २०२५ रोजी समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने वर्षावासाच्या पूर्वसंध्येला धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भन्ते आनंदबोधी महाथेरो बोलत होते. प्रारंभी उपासिका गीताबाई नामदेव झेंडारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिकरित्या बुध्द वंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसुंचलन रिपाइं (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव एस.के. गायकवाड यानी केले.यावेळी सेवानिवृत्त पोलीस हवालदार संदिपान वाघमारे,अनिल वाघमारे, शिवाजी वाघमारे, चंदकांत वाघमारे,हणमंत वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, दिपक वाघमारे, कुंडलिक वाघमारे, भामाबाई वाघमारे श्रीदेवी वाघमारे, विमलबाई बरसोडे,माजी उपसपंच कविता गायकवाड, उज्वला वाघमारे, श्रीदेवी महादेव वाघमारे, कोमल झेंडारे, कमळाबाई वाघमारे, शुष्मा वाघमारे, ठकूबाई वाघमारे, कमलबाई धाडवे,जिजाबाई वाघमारे सह ग्रामस्थ, महिला, युवा कार्यकर्ते मोठया रुंख्येने उपस्थित होते.