आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्ट:-विजय पिसे जळकोट
. जिल्हा परिषद प्रशाला जळकोट येथे आषाढी एकादशी निमित्त आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरणात विठ्ठल नामाचा गजर करत टाळ लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. शााळेती विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनी विठ्ठलाचा व रुक्माई चा वेश परिधान करून आलेेे होते. त्यामुळेे शाळेतील वातावरण भक्तीमय झाले होते . व चैतन्यमय वातावरणात अभंग, गवळण म्हणत फुगड्या घालण्यात आल्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सारणे संतोष शाळेतील शिक्षक पुष्पलता कांबळे, जयराम शिंदे, पुरंत , समाधान पवार वैष्णवी कदम, आरती सूरवसे, मडोळे सर हे उपस्थित होते.