spot_img
spot_img
spot_img

बोरगावच्या सरपंच पदी कविता कांबळे यांची बिनविरोध निवड 

वागदरी( एस.के. गायकवाड ):

बोरगाव ( तुपाचे) ता. तुळजापूर येथील सर्वसाधारण जागेवरील विद्यमान सरपंच सौ. अर्चना मोहन माने यांनी साडेचार वर्षे कारभार केला आणि उर्वरित काळासाठी आपल्याच पॅनल मधील अनु. जाती प्रवर्गातील पण सर्वसाधारण जागेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या सौ. कविता गौतम कांबळे यांना सरपंच होण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला आणि दिनांक 8/7/2025 रोजी सरपंच पदाची निवडणूक पार पडली त्यात सौ.कविता गौतम कांबळे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली यावेळी अध्यासी अधिकारी सरपंच निवडणूक म्हणून श्री. ए .सी.कावळे विस्तार अधिकारी ( पं) पंचायत समिती तुळजापूर हे उपस्थित होते. सहायक म्हणून ग्रामसेवक श्री. संजय नवगिरे होते. यावेळी माजी सरपंच अशोक बोरगावकर, उपसरपंच लक्ष्मण पाटील, ग्राम पंचायत सदस्य श्री. राम कलकुटे, सौ. वंदना सुतार, माजी सरपंच अर्चना माने, बसवंतराव मुळे, सौ. कविता कांबळे, सह गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री अप्पवराव मुळे, दत्तात्रय साळुंखे, काका पाटील, मोहन माने सर, बाबुराव पाटील, अरविंद गायकवाड,मारुती बनसोडे, राहुल जाधव, गौतम कांबळे, शैलेंद्र सोनकांबळे, आशिष जाधव, लहू सोनकांबळे, लक्ष्मण कांबळे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते. सरपंच निवडीनंतर छत्रपती शिवाजी महाराज, म. बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार घालून गावातून मिरवणूक काढण्यात आली व शेवटी भिमनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातल्यानंतर नूतन सरपंच सौ. कविता गौतम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अर्चना मोहन माने, मोहन माने सर , मारुती बनसोडे यांची भाषणे झाली

Related Articles

ताज्या बातम्या