spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग येथील लोकशाहीर आणाभाऊ साठे यांचे चौकात १ ऑगस्ट पर्यंत स्मारक उभा करून सुशोभित करावे 

नळदुर्ग येथील लहुजी शक्ती सेनेची नगर प्रशासनाला हाक

नळदुर्ग दादासाहेब बनसोडे  

नळदुर्ग येथील लोकशाहीर साहित्यरत्न आणाभाऊ साठे यांच्या नावाने गेले अनेक वर्षांपासून स्मारकासाठी जागा आसुन याच चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक तयार करून त्या जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी नळदुर्ग येथील लहुजी शक्ती सेनेच्या वतीने एका निवेदना द्वारे मागणी करण्यात आली .

हि जागा सिव्हिल हॉस्पिटल जवळ गोलाई येथे आसुन त्याच ठिकाणी स्मारक व्हावे आशा प्रकारची गेले अनेक वर्षांपासून मातऺग समाजाच्या वतीने करण्यात येत आहे .

नळदुर्ग कराऺच्या वतीने या चौकाचे सुशोभित करण्यात यावे म्हणून अनेक वेळा लेखी, तोऺडी विनंती अर्ज केला आहे व या बाबत निवेदन किंवा तोंडी माहिती तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा राणाजगजितसिंह पाटील तुळजापूरचे तहसीलदार, व नळदुर्ग येथी कर्तव्यदक्ष मुख्यधिकारी यांना अनेक वेळा वेळोवेळी पत्रव्यवहार केला आसुन या विषयीचा पाठपुरावा केला आहे वरील सर्व मान्यवरांनी सहानुभूती करून जागेची मोजणी करून अंदाजपत्रक करण्याचे सुचवले आहे. तरीही न प च्या वतीने काहीही केले जात नाही म्हणून लहुजी शक्तती सेनेच्या वतीने न प ला निवेदन देऊन लवकरात लवकर स्मारक, चौकाचे सुशोभित करण करण्यात यावे अशी विनंती केली आहे..

नळदुर्ग परिसरातील अनेक नागरीक दळण वळणासाठी नळदुर्ग ला ये जा करतात

याच परिसरात हजारो मात॑ग समाज बांधव नळदुर्ग व परीसरात राहतो परंतु आमचे दैवत व भारत देश स्वतंत्र लढा व स॑युक महाराष्ट्र लढा, गोवा मुक्ती लढा, पश्चिम बंगाल चा लढा दिल्ली चा लढा अशा अनेक लढाईमध्ये मोलाचे योगदान असलेले थोर देशभक्त, समाजसुधारक, साहित्य रत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यासाठी कोणतेही स्मारक, चौक नाही म्हणून नळदुर्ग येथे अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या सिव्हिल हॉस्पिटल जवळील गोलाई येथील चौकात स्मारक करून सुशोभित करण करण्यात यावे. अन्यथा मातऺग समाज लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने येत्या दि २८ / ०६ / २०२५ रोजी उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले यावेळी कार्यालयीन अधिक्षक खलील शेख यांना निवेदन देतात लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख पदाधिकारी शिवाजी गायकवाड धर्मराज देडे ,महादेव मोरे, धनराज गायकवाड, नारायन हजारे प्रकाश काळे, लहु देडे, प्रदिप गायकवाड बाळु देडे विजय गायकवाड ईत्यादी समाज बांधवा उपस्थित होते .

Related Articles

ताज्या बातम्या