वागदरी (एस. के.गायकवाड) :
वृक्षारोपन आभियान ही सतत चालणारी प्रक्रिया असून पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने वृक्षारोपना बरोबरचं वृक्ष संगोपन करणे ही काळाची गरज आहे.असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.सिद्रामाप्पा खजुरे (खुदावाडी) यानी गुजनूर

ता.तुळाजापूर येथे बोलताना केले.
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र, एक पेड माँ के नाम या शासनाच्या आभियाना अंतर्गत धाराशीव जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या हरित धाराशिव आभियान – २०२५ च्या वतीने गुजनूर ता.तुळजापूर येथे शासकीय गावठान जमिनीवर वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे आयोगजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ.खजुरे उदघाटक म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गुजनूरचे विद्यामान सरपंच फूलचंद वाघमारे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शहापूरचे सरपंच उमेश गोरे, उपसरपंच नानासाहेब पाटील, गुजनूर चे उपसरपंच,व्यकटसाळूंके,तंटा मुक्त अध्यक्ष साहेबराव साळूंके, शहपूर तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते भास्कर सुरवसे,डॉ.यशवंत नरवडे, उप कृषी अधिकार डी.पी.बिराजदा,आदी उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये जिल्हा प्रशासनातील महसुल,कृषी,बांधकाम, शैक्षणिक सह सर्व विभागातील अधिकारी,कर्मचारी गुजनूर,शहापूर, गुळहळ्ळी आदी गावातील अशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, उमेदच्या सिआरपी,महिला,युवा कार्यकर्ते, शहापूर, गुजनूर येथिल जि.प. प्राथमिक शाळ, छत्रपती शिवाज विद्यालय शहापूर आदी गावातील शालेय विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक.ग्रामस्थानी सहभाग नोंदविला होता.
प्रारंभी विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी येथील शासकीय गायरान जमिनीवर विविध प्रकारची तिन हजार व्रक्षाच्या रोपांचे वृक्षारोपन करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी,ग्राम महसुल अधिकारीआर.बी.पाटील मॅडम, सहाय्यक कृषी अधिकारी यू. टी. कर्ले मॅडम,मंडळ कृषी अधिकारी सत्यजीत देशमुख, बांधकाम शाखाआभियंता जी.टी.घाटे, ग्राम पंचायत अधिकारी प्रशांत कुंभार, जी.आर.जमादार,पोखरा अभियानाचे स्वयंमसेवक जितेंद्र माने,श्रीमंत सुरवसे, हरीष सुरवसे,आरविंद जगताप,सामाजिक कार्यकर्ते जयभीम वाघमारे,अक्षय सुरवसे, मोहन व्हंताळे,किशोर वाघमारे,सह ग्रामस्थ उपस्थित होते.






