वागदरी (प्रतिनिधी):
केरूर ता.तुळजापूर येथिल पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भोसले यांची आदर्श समाजसेवा पुरस्कारासाठ निवड करण्यात आली असून लवकरच एका शानदार कार्यक्रमा या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
भटके विमुक्त आदिवासी पारधी विकास सामाजिक संघाना महाराष्ट्र राज्य च्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा तथा पारधी आदिवासी बहुउद्देशिय सामाजिक संस्था केरूर च्या सचिव सुनिता भोसले यांची संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव व संभव प्रतिष्ठाण केशेगाव ता.तुळजापूर च्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरिय आदर्श समाजसेवा पुरस्कार-२o२५ साठी निवड झाली असून लवकरच त्याना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याचे रितसर पत्र संस्थेचे संख्यापक दयानंद काळूंके व तुकाराम क्षिरसागर यानी त्याना दिले आहे. सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्य बदल त्यांचे सर्वत्र आभिनंदन केले जात आहे.






