spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग बसस्थानक येथे चोवीस तास वहातुक नियत्रंकाची सेवा उपलब्ध करावी : भाजपा सोशल मिडीया सेल सह प्रवासी जनतेची मागणी

वागदरी (एस.के.गायकवाड):

धाराशिव जिल्ह्यातील परिवहन महामंडळच्या तुळजापूर आगार अंतर्गत येणाऱ्या नळदुर्ग बसस्थानक २४वाहातूक नियंत्रक सेवा उपलब्ध करावी असी मागणी भाजपा सोशल मिडीया सेल चे तुळजापूर तालूका अध्यक्ष व संयोजक किशोर धुमाळ सह प्रवाशी जनतेतून होत आहे.

या संदर्भात विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय धाराशिव याना एक लेखी निवेदन देण्यात आले असुन त्यात म्हटले की तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे मुंबई ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर वसलेले ऐतिहासिक शहर असून जवळपास ६५ गावांच्या केंद्र स्थानी आहे. देशभरात कोठेही जायचे असेलतर नळदुर्ग बस स्थानकावरचं यावे लागते. त्यामुळे या बस स्थानकावर प्रवासांची नेहमी वर्दळ असते. रात्रीच्याही वेळी या बसस्थानकावरून लांबपल्याच्या पंधरा ते वीस बसेस ये जा करतात. त्यामुळे या ठिकाणी चौवीस तास वाहातुक नियंत्रकाची गरज आहे. तसेच या ठिकाणी अगाऊ आरक्षणाची सोय नसल्याने प्रवासाना अगाऊ आरक्षणासाठी उमरगा किंवा तुळजापूरलाचं जावे लागते त्यामुळे सामान्य प्रवाशाना नाहक अर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तरी या बस स्थानकावर अगाऊ अरक्षणाची सोय करावी असी ही मागणी करण्यात येत आहे.या निवेदनावर भाजपा कार्यकर्ते व किसान मोर्चा अध्यक्ष अंगद जाधव, सरचिटणीस कल्याण बिराजदार सुनील सुर्यवंशी जाधव मेजर सह कार्यकर्त्यांच्या सह्या असून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलेले शिफारस पत्र ही जोडण्यात आले आहे.सदर मागणीचे निवेदन संबधित परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्यालय सेंट्रल ऑफीस मुंबई यानाही पाठविण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या