वागदरी ( एस.के. गायकवाड) :
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रेरणा घेवून आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणा शिवाय दुसरा पर्यायचं नाही.तेंव्हा शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा! हा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी दिलेला मुलमंत्र आत्मसात करून बहुजनातील तरुणांनी परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेवून आपला पर्यायाने समाजाचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा बालकण्यान समितीचे सदस्य दयानंद काळूंके ( अणदूर ) यानी वागदरी ता.तुळजापूर येथे आयोजित. कार्यक्रमात बोलताना केले.
साहित्य सम्राट लोकशाहीर
डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव मंडळ वागदरी च्या वतीने साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्ताने आभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी दयानंद काळुंके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून भालचंद्र यादव, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष राजकुमार पवार, उपाध्यक्ष मदनराजे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) चे युवा नेते अमोल पाटील, आदी उपस्थित होते
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून आभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अमोल पाटील, रामचंद्र लोंढे, शिवाजी मिटकर गुरुजी आदीची ही मार्गदशीनपर भाषणे झाली. यावेळी शालेय विद्यार्थांची ही भाषणे झाली.
याप्रसंगी रामचंद्र यादव, महदेव बिराजदार, रामसिंग परिहार, अमोलसिंग परिहार, भाजपाचे तालूका उपाध्यक्ष किशोर सुरवसे, भाजपा मिडीयाविभाग तालूका प्रमुख तथा संयोजक किशार धुमाळ, संजय काकडे ग्रा.प. सदस्य अमोल पवार,सेवा निवृत्त पोलीस हवालदार संदिपान वाघमारे, पीलीस पाटील बाबुराव बिराजदार, अनिल वाघमारे, रिपाइं (आठवले गट ) तालुका संघटक सुरेश लोंढे, शाखा अध्यक्ष . देवानंद लोढे,डॉ. सुरज लोंढे,
सह महिला,ग्रामस्थ,युवा कार्यकर्ते मोठ्य संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड यानी केले तर अभारप्रदर्शन जयंती उत्सव कमिटीचे बाळू कांबळे यानी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव कमिटीचे बाळू भंडारे, दत्ता कांबळे, आप्पा भंडारे, कृष्णा कांबळे,सुर्यकांत वाघमारे, अण्णासाहेब वाघमारे, रमेश वाघमारे, सहादेव वाघमारे सह कार्यकर्त्यानी परिश्नम घेतले.






