केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा ना रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान
नळदुर्ग प्रतिनिधी दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील लहुजी शक्ती सेनेचे राज्याचे नेते शिवाजी विश्वनाथ गायकवाड यांचा दिल्ली येथे साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ आणाभाऊ साठे राष्ट्रीय समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
हा पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा ना रामदासजी आठवले यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला .
महाराष्ट्र राज्यात दलित पिडीत गोर गरीब जनतेच्या समस्या प्रामाणिक पणे सोडविण्याचा प्रयत्न करीत आसतात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अनेक समस्यावर निदर्शने अंदोलने उपोषण अनेक कार्यक्रमात ते आग्रेसर आसतात म्हणून दिल्ली येथील साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून समितीने यांची लोकाशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभुषण पुरस्कार जाहीर झाला होता त्यानुसार दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात या डॉ आणाभाऊ साठे राष्ट्रीय समिती दिल्ली यांच्या वतीने समाज भुषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी दिल्ली येथे केऺद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले अ.जा ज. राष्ट्रीय आधक्ष लालसिऺग आर्या लोकसभा राज्यसभा खासदार आनिल भोसले खासदार सुनील गायकवाड व ईतर केंद्रीय मान्यवर प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न करण्यात आला
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन कौतुक होत आहे .






