spot_img
spot_img
spot_img

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महात्मा फुले, अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाचा निषेध,

 

धाराशिव ,. प्रतिनिधी….केंद्राचा १७०००कोटी निधी महाराष्ट्र शासनाच्यावतीने हमी न घेतल्याने अंमलबजावणी ठप्प, वंचित युवा आघाडीचा निषेध

अनुसुचित जातींसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाचा महात्मा फुले सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांनी पाठवलेला तब्बल १७०००कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून हमी न दिल्याने वापरात न येता अडकून पडला आहे. परिणामी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या सूक्ष्म वित्त, उद्यम निधी, मियादी ऋण आणि शैक्षणिक कर्ज अशा महत्त्वाच्या योजना ठप्प झाल्या आहेत. याविरोधात वंचित युवा आघाडीकडून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की निधीच्या हमीअभावी हजारो अर्ज प्रलंबित असून लाभार्थ्यांना डावलले जात आहे. यामुळे अनुसूचित जातीतील युवक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक हक्कांवर गदा आली आहे. ही अघोषित अडवणूक असून, राज्य शासनाची भूमिका संविधानाच्या सामाजिक न्याय तत्त्वांशी विसंगत असल्याचा आरोप करण्यात आला.पुढील प्रमाणे प्रमुख मागणी आहेत की शासनाने NSFDC कडून आलेल्या निधीस तातडीने हमी द्यावी, प्रलंबित लाभ तात्काळ वितरित करावेत, जाणीवपूर्वक अंमलबजावणी थांबवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच जिल्हा कार्यालयांना कुलूपबंदीचा निषेध करण्यात यावा आणि अनुसूचित जातीतील तरुणांचा आर्थिक विकास व शिक्षणाचा हक्क सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली. शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला

 

या निषेध निवेदनावर

जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण , जिल्हा संघटक बाबा वाघमारे, धाराशिव तालुका अध्यक्ष सागर चंदनशिवे, तालुका संघटक मनीष कांबळे, कळंब तालुका महासचिव मिलिंद खुणे, तालुका युवा उपाध्यक्ष मोहन वाघमारे, तालुका सचिव महेश बीडबाग, युवक तालुका सदस्य बालाजी राऊत, युवक शहराध्यक्ष धाराशिव संतोष साबळे, ॲड. जिल्हा उप अध्यक्ष एल. जी.खुणे, अमन मुद्दे, युवक आघाडीचे जिल्हा तालुका पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या