वागदरी (एस.के. गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी जिल्हा धाराशिव येथिल सुपूत्र सध्या बिबेवाडी पूणे येथे राहत असलेले श्रीमंत धर्मा वाघमारे यांचे प्रदिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यानी रोजगार मिळविण्याच्या शोधात पुणे येथे
गेले आणि बिबेवाडी पूणे येथे ते स्थायिक झाले. अत्यंत मिथ भाषिक, प्रामाणिक, कष्टाळू प्रेमळ स्वभाव करत असलेल्या कामावर निष्ठा यामुळे त्यानी अल्पावधितच बिबेवाडी पूणे येथे स्वतःच हक्काच घर बांधल.मुला मुलींच शिक्षण केल.शून्यातून विश्व निर्माण करणार व्यक्तीमत्व त्यांच्या जाण्याने काळाच्या पडद्याआड झालेल आहे. मृत्यूसमई त्यांच वय ५१ वर्षे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नि, एक मुलगा, दोन मुली, भावंडे, जावाई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या दुःखाद निधना बद्दल त्याना वागररी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली.






