कनगरा (ता. धाराशिव) येथील माजी सरपंच शरद हनुमंतराव पाटील व त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध अनुसूचित जातींच्या नागरीकांनी गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे सामूहिक तक्रार सादर केली आहे. १० जून २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनंतरही कारवाई न झाल्याने संतप्त नागरीकांनी १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता
तक्रारीनुसार, शरद हनुमंतराव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी सरपंच पदाचा गैरवापर करत गावातील सार्वजनिक रस्ता अडवून स्वतःच्या मालकी हक्कात दाखवून अन्याय केला आहे. हा रस्ता अनुसूचित जातीच्या वस्तीतील नागरिकांच्या रोजच्या वापराचा असून, तेथून जाण्याचा मार्ग बंद करण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच, गावातील भूमापनाच्या नकाशानुसार असलेल्या ७० x ३० फुटांच्या सार्वजनिक जागेवर बेकायदेशीररित्या कंपाउंड बांधून अतिक्रमण केल्याचेही निदर्शनास आले आहे. सदर प्रकारावर प्रशासनाने वेळेवर उपाययोजना न केल्याने अन्यायग्रस्त नागरीकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. तात्काळ हा रस्ता खुल्ला करून परिचय मारलेली कंपाऊंड काढून टाकावे अशी मागणी केली
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी करण्यात आली असून दोषींवर कठोर व कायदेशीर कारवाई व्हावी,अशी येथील बौद्ध समाजाने मागणी केली आहे. जो पर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे एकूण 40ते 50 महिला व पुरुष आणि लहान मुलासह बसले आहेत
या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जाहीर पाठिंबा दिला असून जिल्हा प्रशासनाने तात्काळ याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे






