spot_img
spot_img
spot_img

येडोळा येथे वर्षावास निमित्ताने भिकू संघाची धम्म देशना व विपशना कार्यक्रम संपन्न वागदरी ( एस.के.गायकवाड ):

वागदरी ( एस.के.गायकवाड ):

तुळजापूर तालूक्यातील मौजे येडोळा जिल्हा धाराशिव येथे बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भिकू संघ नवी दिल्ली या भिकू संघाची धम्म देशना व विपशना कार्यक्रम संपन्न झाला.

वर्षावास निमित्ताने बौद्ध धम्म प्रचार व प्रसार आभियान नळदुर्ग सर्कल- २o२५ ता.तुळजापूर अंतर्गत बुध्दिस्ट इंटरनॅशलन भिकू संघाचे राष्ट्रीय प्रभारी सोमनंद यांची धम्मदेशना व भंते धम्मरक्षक यांची विपशना कार्यशाळ जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून भारतिय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम,रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, रिपाइं (आठवले) चे नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे,सामाजिक कार्यकर्ते शंकर भालेराव,समता सैनिक दलाचेअनिल सरतापे,कुमार ढेपे शरद बागडे,वैभव सिरसाट आदी उपस्थित होते.

प्रारंभी बुद्धिस्ट इंटरनॅशल भिकू संघ नवी दिल्लीचे राष्ट्रीय प्रभारी भदंत सोमानंद,महाराष्ट्र प्रभारी माताजी शासन मेता, माताजी विश्वमित्रा व भंते धम्मरथ यांचे येडोळा येथे आगमन होताच पुष्पांचा वर्षाव करत धम्म रॅलीने स्वागत करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचा हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बुध्द वंदनेने धम्म देशनेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.या प्रसंगी भंते शासन मेता,भंते विश्वमित्रा यांची ही धम्म देशना झाली तर भंते धम्मरक्षित यानी दोन दिवशिय विपशना (ध्यान साधना) कार्यशाळ घेतली.

या कार्नक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन समता सैनिक दलाचे लेफ्ट कर्नल एम.डी.लोंढे (पुणे) यानी केले तर अभार प्रदर्शन रामचंद्र लोंढे यानी केले. यावेळी रमेश लोंढे,देवानंद लोंढे, सुरेश लोंढे,मारुती लोंढे, अंकूश लोंढे, डॉ.सुरज लोंढे, नागेश लोंढे, अतुल कांबळे,प्रविण कांबळे, अमर जेटीथोर, अमित लोंढे,भानुदास लोंढे,अर्जुन लोंढे, सुरज गायकवाड,गौरव लोंढे सह महिला, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या