spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग येथील दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य डुकरांचा हौदोस घन कचरा व्यवस्थापन झोपी गेली आहे का? आणि दिवा बत्ती ही गुल 

नळदुर्ग नगर प्रशासनाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष .

कोणी दिवाबत्ती देता का दिवाबत्ती 

नळदुर्ग प्रतिनिधी दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात व शहरातल्या दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य पसरले आसून याच बरोबर

वस्तीतील दिवा बत्ती गुल झाली आहे .तरी सुद्धा नगर प्रशासन शांत आहे

अनेकदा तोंडी सांगुन व लेखी देऊन पण या गोष्ठीकडे प्रशासन जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे . नळदुर्ग या सारख्या शहरात म्हणजे दलित वस्तीत डुकराने थैमान घातले आहे या डुकराचा बंदोवस्त करावा शिवाय भिमनगर , बुद्धनगर, डॉ आंबेडकर नगर , इंदिरानगर अदि ठिकाणी चक्क रस्त्यावरील गटारी त्यामधील धाण काढुन रस्त्यावर फेकले जाते त्यामधुन मानवाच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो डॉ आंबेडकर नगर [ शिवकरवाडी ] विभागात सार्वजनिक शौचालय आहे आणि ती शौचालय वापरात आहे त्या ठिकाणी दोन लॅम्प फोकस बसविण्या संदर्भात अर्ज सुद्धा देऊ केला होता परंतू त्या अर्जला नगर परिषदे कडुन केराची टोपली मिळाली आसल्याचे दिसुन येत आहे अनेक ठिकाणी दिवाबत्ती बंद आहेत त्या दिवाबत्ती बसविण्यास नगर परिषदेचे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत ” एकच ठेका मट्रेल नाही काका ” ही एक नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची म्हण ठरली आहे की ,जेणे करून यांच्या घरचचं मट्रेल जात आसल्या सारखे बोलतात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यानी दलित वस्तीचा सर्वे करावा जर केला आहे तर मग कुठल्या बत्त्या गुल झाल्या आहेत आहेत शोधाव्यात केवळ दलित जनता शांत आहे म्हणून त्याचा फायदा पण घेऊ नये कारण नगर पालिका दलितांच्या मुळ प्रश्नांवर जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत आहे .

आज ही परिस्थीती तशीच आहे आज ही नगर परिषदेचा घन कचरा व्यवस्थापन आहे तरी कुठे आणि काय करत आहे ” फक्त पैसे नोटा मोजण्यावरच जोर आहे का ? ” दलित वस्तीत गटारी तुडुंब , रस्त्यावर कचरा , झाडण्यासाठी कोणी नाही , पावडर नाही , फिनेल नाही , दिवा बत्ती नाही , वेळेवर पाणी नाही , या सर्व गोष्टी कोणी लक्षात आणुन देत नाही ह्या सर्व गोष्टी आता जनतेला भेडसावत आहेत .

नगर परिषदेच्या कोणत्या कर्मचाऱ्यानी वरिल विषयी सर्वे केला आहे त्यांनी जनतेच्या मानसिकतेचा विचार करून वरिल विषयी संपूर्ण माहिती संबंधित अधिकारी यांना दिली पाहिजे परंतू आसे न होता तेथील कर्मचारीच अधिकारी बनतात कुठेतरी पाणी मुरतय ह्या गोष्ठी अधिकाऱ्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे या सर्वांचा विचार करून तात्काळ वरिल कामास सुरुवात करावी अन्यथा दलित जनता पँथरचे रूप धारण करेल आशी भावना दलित जनतेत व्यक्त होत आसल्याचे दिसुन येत आहे .

Related Articles

ताज्या बातम्या