spot_img
spot_img
spot_img

नंदगाव येथे वर्षावास निमित्ताने भिकू संघाची धम्म देशना कार्यक्रम संपन्न

नंदगाव (शाम नागिले): तुळजापूर तालूक्यातील मौजे नंदगाव येथे बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भिकू संघ नवी दिल्ली या भिकू संघाची धम्म देशना व विपशना कार्यक्रम संपन्न झाला.

या बाबत सविस्तर असे की, वर्षावास निमित्ताने बौद्ध धम्म प्रचार व प्रसार आभियान नळदुर्ग सर्कल- २o२५ ता.तुळजापूर अंतर्गत बुध्दिस्ट इंटरनॅशलन भिकू संघाचे राष्ट्रीय प्रभारी सोमनंद यांची धम्मदेशना व भंते धम्मरक्षक यांची विपशना कार्यशाळा नंदगावचे नूतन सरपंच शशिकांत नागिले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हानंद माने ,पंढरी सुरवसे, अनिल भालेराव,शंकर सुरवसे आदी उपस्थित होते.

प्रारंभी बुद्धिस्ट इंटरनॅशल भिकू संघ नवी दिल्लीचे राष्ट्रीय प्रभारी भदंत सोमानंद,महाराष्ट्र प्रभारी माताजी शासन मेता, माताजी विश्वमित्रा व भंते धम्मरथ यांचे नंदगाव येथे आगमन होताच पुष्पांचा वर्षाव करत धम्म रॅलीने स्वागत करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचा हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बुध्द वंदनेने धम्म देशनेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.या प्रसंगी भंते शासन मेता,भंते विश्वमित्रा यांची ही धम्म देशना झाली तर भंते धम्मरक्षित यानी दोन दिवशिय विपशना (ध्यान साधना) कार्यशाळ घेतली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन एस.के. गायकवाड यानी केले तर अभार सरपंच शशिकांत नागिले यानी मानले. यावेळी मरगु सुरवसे, सिताराम मूकदान,तुळशीराम नागिले,विनायक नागिले,बुद्धा नागिले, नागनाथ बनसोडे, सुधाकर नागिले, अनिल बनसोडे,दगडू लोखंडे, संगीता जाधव, जयश्री नागिले, भारताबाई मूकदान, पूनम लोखंडे, राधिका सोनकांबळे, सरूबाई नागिले, अंबिका नागिले, महेश गायकवाड, सह बौद्ध उपासक,उपसिका ,बाल-बालिका ,महिला, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या