वागदरी (एस. के.गायकवाड):
नळदुर्ग ता.तुळजापूर येथिल कन्या विक्रीकर अधिकारी पुजा लक्ष्मण कांबळे (प्रमोदा) कांबळे यांचा सोलापूर येथे भिमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्याक्ष डॉ.सतिश खारवे व संगणक आभियंता रोहीत खारवे यांच्या हस्ते यथोचित कौटूंबिक सत्कार करण्यात आला.
नळदुर्ग येथील भीमकन्या व आंबेडकर चळवळीतील झुंझार नेते प्रमोद कांबळे यांची कन्या कुमारी पूजा प्रमोद कांबळे यानी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पदवी शिक्षण पूर्ण करून जिद्द आणि चिकाटीने एम.पी.एस.सी. परिक्षेची तयारी करून सेल्स टॅक्स व इनकम टॅक्स आधिकारी पदाची परिक्षा उत्तिर्ण होऊन सध्या बांद्रा मुंबई येथे सेल्स टॅक्स व इनकम टॅक्स अधिकारी या पदावर कार्यरत असून त्या सोलापूर येथे आल्या नंतर खारवे परिवार व भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आमदाबाद ( गुजरात) येथे कार्यरत असलेले संगणक अभियंता रोहित खारवे. व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.सतीश खारवे तसेच प्रमोदजी कांबळे यांचा परिवार व दिपकजी कांबळे हे उपस्थित होते.






