वागदरी ( एस.के. गायकवाड ):
मराठा आरक्षणाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली दी.२९ऑगस्ट २०२५ रोजी अझाद मैदान मुंबई येथे मराठ समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळले पाहीजे या प्रामुख मागणीसह अन्य मागण्या करिता आयोजित बेमुदत आंदोलनात सहभागी होण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील वागदरी ता. तुळजापूर येथून मराठा आंदोलक कार्यकर्ते वर्गणी करून खाजगी वहाने मुंबईला रवाना झाले आहेत.
प्रारंभी गावातील ग्रामदैवत मारुती मंदीरा समोर वहानसह कार्यकर्ते एकत्र येवून श्री राम भक्त मारूती रायाचे व गणपती बप्पाचे दर्शन घेवून गाडीचे (आयसर टॅम्पो ) चे पुजन करून माता भगिनीने औक्षण केले.त्या नंतर वागदरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवून कार्यकर्त्यानी ” आरक्षण आमच्या हक्काचं,नाही कोणाच्या बापाचं ” ” कोण म्हणतय देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही ” जय भवानी जय शिवाजी, एक मराठ लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलनकर्ते कार्यकर्ते वर्गणी करून खाजगी वहानाने मुंबईकडे रवाना झाले.उपस्थित ग्रामस्थानी त्याना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यंकट पाटील, ह.भ.प. राजकुमार पाटील,मदनराजे पाटील, किशोर सुरवसे, किशोर धुमाळ,अमोल पाटील, दत्ता सुखसे,दत्ता पाटील, ज्ञानेश्वर पाटील,रामचंद्र यादव,राजकुमार पवार, देविदास नागणे,बाबूराव बिराजदार, राजेंद्र पाटील, बाळू पवार, नागनाथ धुमाळ, नागनाथ वचनें सह कार्यकर्ते मोठ्य संखेने उपस्थित होते.






