नळदुर्ग येथे मोठ्या भक्तीभावाने गणरायाला निरोप लेझीम पथक ठरले मिरवणुकीचे आकर्षण
नळदुर्ग प्रतिनिधी. दादासाहेब बनसोडे
नळदुर्गच्या ऐतिहासिक शहरांमध्ये गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला यावेळी ढोल ताशाचा गजर, हलग्यांचा कडकडाट लेझीम पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले आहे तसेच टिपरी संघांचे नेत्रदीपक खेळ आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषाने नळदुर्ग शहर अक्षःरश दुमदुमले .
नळदुर्ग शहरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकी नंतर नळदुर्ग येथे गणेश भक्तांनी श्री गणेशाला भावपुर्ण निरोप दिला. गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली. नळदुर्ग येथे ६ सप्टेंबर रोजी मोठ्या दिमाखात व थाटामाटात डॉल्बी सिस्टीम ढोल ताशा आदिच्या सहाय्याने गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. सायंकाळी मराठा गल्ली येथील शिवशाही तरुण गणेश मंडळाची विसर्जन मिरवणुक निघाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस सुरवात करण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीत शिवशाही तरुण गणेश मंडळ, धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ, नव चैतन्य तरुण गणेश मंडळ, न्यु – चैतन्य तरुण गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ, जय भवानी तरुण गणेश मंडळ, जय हनुमान तरुण गणेश मंडळ, शिवनेरी गणेश मंडळ, जय हिंद तरुण गणेश मंडळ व्यासनगर, जवाहर गणेश मंडळ, इंदिरानगर गणेश मंडळ, माऊली नगर गणेश मंडळ हे शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदविला तब्बल सात तास चाललेली गणेश विसर्जन मिरवणुक रात्री १२ वाजता सांगता करण्यात आली. मिरवणुकीत ढोल – ताशाचा प्रचंड गजर, हलग्यांचा कडकडाट तसेच लयबद्ध नेत्रदीपक लेझीम व टिपरी संघाचा खेळ यामुळे विसर्जन मिरवणुकीत अतिशय मिरवणुक पाहाण्यासाठी नळदुर्ग शहरातील नागरिकांनी व महिलांनी खुप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .प्रत्येक गणेश मंडळाने फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये श्री गणेश देवाची मुर्ती ठेवली होती. शिवशाही तरुण मंडळ, धर्मवीर तरुण गणेश मंडळ, जय हिंद तरुण गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ, जय भवानी तरुण गणेश मंडळ या मंडळाच्या उंचच उंच गणेश मुर्ती गणेश भक्तांचे लक्ष केंद्रीत करत होते.गणेश विसर्जन गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर मराठा गल्ली येथील बोरी नदीवरील गणपती विसर्जन घाट, अंबाबाई मंदिराजवळील गणपती विसर्जन घाट याठिकाणी मोठ्या भक्तीभावाने श्री गणपतीचे विसर्जन करण्यात आले.हे मिरवणूक किल्ला गेट क्रांती चौक ऐतिहासिक चावडी चौक धर्मवीर संभाजी चौक मार्गे विसर्जन विसर्जन थळी विसर्जन करण्यात आले यावेळी नळदुर्ग शहरातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक अधिक क्षेत्रातील लोकांनी गणरायाला या वर्षातला भावपूर्ण निरोप दिला अनेकाने दिवा पंथी लावून दर्शन घेतले यावेळी तुळजापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख नळदुर्ग ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन यादव पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके सह पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगला बंदोबस्त तैनात ठेवलेला होता त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे नागरिकांतून विशेष आभार मानले जात आहे यावेळी नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने शहरांमध्ये खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या गणेश विसर्जना मध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून खुप मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता सुविधा ठेवलेली होती अनेक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .






