spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग येथे “आलमगीर औरंगजेब ” “सर तनसे ज्यूदा ” गगणभेदी घोषणा देणाऱ्या समाज कंटकावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा : – हिंदु 

नळदर्ग प्रतिनिधी दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग येथे हिंदु समाजाच्या भावना दुखावणाऱ्या मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत “आलमगीर औरंगजेब” व “सर तनसे ज्युदा” अशा घोषणा देऊन देशद्रोही कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नळदुर्ग शहर सकल हिंदु समाजाने दि. ११ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या नळदुर्ग शहर बंदला शहरातील हिंदु व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपली दुकाने कडकडीत बंद ठेऊन बंद १०० टक्के यशस्वी केला. यावेळी सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशद्रोही कृत्य करणारे आरोपी व त्यांच्या म्होरक्याला तात्काळ अटक करावी अन्यथा दि. १५ सप्टेंबर पासुन नळदुर्ग शहर बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी नळदुर्ग शहर सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नळदुर्ग येथे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या करणारा क्रूरकर्मा देशद्रोही औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आलमगीर औरंगजेब अशा घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर चौका चौकात थांबुन सर तनसे ज्युदा अशा धमक्या देणारे नारे देण्यात आले.या घोषणाबाजीनंतर समाजामध्ये सार्वजनिक शांततेचा भंग होऊन असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक मोर्चा किंवा जुलुस मध्ये असे प्रकार सातत्याने घडले आहेत. यापुर्वी दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी नळदुर्ग शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये “भगवा दहशतवाद” हे शब्द वापरून हिंदुंच्या भावना दुखावणारे वक्तव्य करण्यात आले होते. अशा प्रकारचे भडकावु भाषणे करून युवकांचे माथे भडकविण्याचे प्रकार एक व्यक्ती कायम करत आहे. या आक्षेपार्ह घोषणा देण्यात आलेल्या प्रकरणामध्ये हीच व्यक्ती व त्याचे समर्थक आहेत. याची सखोल चौकशी करावी.

त्याचबरोबर कूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यावर तसेच सर तनसे ज्युदा असे नारे देणाऱ्या शेकडो जिहादीवर व त्यांच्या म्होरक्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अन्यथा दि. १५ सप्टेंबर पासुन नळदुर्ग शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा नळदुर्ग शहर सकल हिंदु समाजाच्या वतीने या निवेदनात देण्यात आला आहे.

सकल हिंदु समाजाने पुकारलेल्या नळदुर्ग बंदला व्यापाऱ्यांसह शहरातील शाळा व महाविद्यालयही बंद ठेवुन या बंदला पाठिंबा देण्यात आला होता. मल्लिकार्जुन मंदिर ते भवानी चौकापर्यंत अतिशय शांततेत पायी चालत जात शेकडो हिंदु बांधवांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांना निवेदन दिले. यावेळी सपोनि नंदकिशोर सोळुंके , सपोनि आनंद कांगुणे ,

पोलिस उप निरीक्षक इश्वर नांगरे , संतोष गिते , सह नळदुर्ग शहरात अतिशय कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

Related Articles

ताज्या बातम्या