spot_img
spot_img
spot_img

अणदूर येथे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर : विजय पिसे जळकोट 

जवाहर महाविद्यालय अणदूर येथील संस्कृत विभाग आयोजित विश्व संस्कृत दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंधलेखनाचे विषय 1) श्रीमद् भगवद्गीतेतून मिळणारे जीवनाचे शिक्षण 2)वेदांचे महत्व 3)स्त्रीशिक्षणाचे महत्व हे विषय असून वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंधलेखन करुन प्रा. डॉ. सत्येंद्र राऊत यांच्या मो. नं. 8208740880 या नंबरवर तसेच rautsatyendra07@ gmail.com वर दि.25 सप्टेंबरपर्यंत पाठवावे. निबंधलेखन कुठल्याही प्रकारचे कापी पेस्ट असू नयेत तसेच शब्दमर्यादा १५०० ते २००० असावी. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. असे प्रा.डॉ. सत्येंद्र राऊत यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी वरील नंबरवर संपर्क करावा.

Related Articles

ताज्या बातम्या