spot_img
spot_img
spot_img

शिक्षक हा ज्ञानदीप असला पाहिजे: डॉ.श्रीकांत येळेगावकर

आवाज महाराष्ट्र न्युज रिपोर्टर : विजय पिसे जळकोट

शिक्षक हा ज्ञानाचा दिवा असला पाहिजे. त्याने काळाप्रमाणे आपले ज्ञान अद्ययावत ठेवायला हवे” असे मत हि.ने. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले.सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा.डॉ. शिवाजी शिंदे म्हणाले की, “शिक्षकांनी भरपूर वाचन करावे. मुलांपुढे आपला आदर्श ठेवावा.त्यांनी कृती व वृत्तीत अंतर पडू देऊ नये”
लेखक मंचाचे अध्यक्ष, फैय्याज शेख यांनी स्वागत करुन, प्रास्ताविक केले. रामकृष्ण अघोर,प्रा.अशोक म्हमाणे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करुन दिला. व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर, स्व. मोदीनाबी मीर इसहाक शेख, गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार साॅलेहा अजीम हफीज वडवान यांना, तर स्व.विजयकुमार हिराचंद शहा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार अनिल काशिनाथ पाटील यांना, तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार नाजनीन बाशा कोरबू महेश रेवण कोटी वाले व संतोष शिवाजी हंपे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वृत्तपत्र लेखक मंचच्या कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला. सहकार्यवाह अरुण धुमाळ यांनी सर्व धर्मीय प्रार्थनेचे गायन केले. उपाध्यक्ष मयुरेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यवाह सुनील पुजारी यांनी आभार मानले.
सोलापूर सोशल महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास, कार्याध्यक्ष रंगसिद्ध कोरे,सदस्य अशोक खानापुरे,प्रा. गणेश लेंगरे, डॉ.रामचंद्र धर्म साले,ॲड. कमरुन्नीसा बागवान, अबेदा शेख,प्रा.धनंजय शहा,अजीम वडवान, बाबा शेख, साजिदा शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या