आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2025 -26
स्थळ:- जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे दिनांक 19/9/25 रोजी झालेल्या मैदानी स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्रशाला. जळकोट तालुका तुळजापूर मधील
संध्या भीम काळे हिचा लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक,
व लक्ष्मी तमन्ना कुंभार हिचा हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक आला तसेच
साक्षी भैरू जाधव हिचा गोळा फेक या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आला.
या तिन्ही मुलींचे व त्यांना मार्गदर्शन करणारे पवार समाधान यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक सारणे संतोष,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वीरभद्र पिसे, उपाध्यक्ष विजय पिसे सर्व समिती सदस्य, शिक्षकवृंद पुष्पलता कांबळे, जयराम शिंदे, रविंद्र डावरे,बसवराज पुरंत , गोपाळ बंदपट्टे, वैष्णवी कदम, स्नेहा माने तसेच गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक या यशाबद्दल मुलींचे अभिनंदन व कौतुक केले.






