spot_img
spot_img
spot_img

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत करावी : रिपाइं(आठवले) ची मागणी

वागदरी ( एस.के. गायकवाड ):

तुळजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा त्वरित पिक पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागणी सह अन्य विविध जिव्हाळ्याच्या मागण्या रिपब्लिकन पार्टी इंडिया (आठवले) च्या वतीने तहसिलदार तुळजापूर यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहर शाखा तुळजापूरच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की तुळजापूर तालुक्यात व परिसरात सर्वत्र परतीच्या पावसाने गेल्या आठ पंधरा दिवसापासून धुमाकूळ घातला असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक पंचनामा त्वरित करून त्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी त्याच प्रमाणे संजय गांधी,इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे मानधन त्वरीत वाटप करावे,तसेच भूमिहीन शेतकरी कुटुंबाला रेशन त्वरित वाटप करावे, त्याचप्रमाणे मागासवर्गीयाना जातीचे दाखले मिळण्यासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून त्यांना त्वरित जातीचे दाखले द्यावेत,तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांना,भोगवाट धारकाना त्यांच्या नावे घर जागा करून त्यांना रमाई आवास पंतप्रधान आवास व इतर योजनेतून घरकुलाचा लाभ देवून घरकुल बांधून देण्यात यावे,आदीसह विविध .मागण्या त्वरीत मंजूर कराव्यात.

रिपाइं (आठवले) च्या वतीने तुळजापूर तहसिलदार याना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के,तुळजापूर शहराध्यक्ष वैजनाथ पांडागळे, तालुका उपाध्यक्ष किसन पांडागळे,रिपाइं चे महादेव जेटीथोर, लहू घोडके, प्रविण मस्के, रामु राठोड सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या