नंदगाव (शाम नागिले) तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील दारूमुक्त गावासाठी विरक्त मठाचे मठाधिपती राजशेखर महास्वामीजी यांच्या आमरण उपोषणानंतर ग्रामस्थांचे विशेष ग्रामसभेत मतदान घेण्याचे ठरले असल्याने त्यानुसार उदया बुधवार दि. 24/09/2025 रोजी होणाऱ्या मतदानातून आडवी बाटलीचा फैसला होणार आहे.
या बाबत सविस्तर असे की , मागील दोन ते तीन महिन्यापासून दारू बंदीसाठी जोरदार नियोजन केला जात आहे त्या साठी जनतेशी संवाद व जनजागृतीसाठी महास्वामीजी हे रोज गावभर पायपीट करीत आहेत.नंदगाव येथे दारुबंदीसाठी स्वाक्षरी मोहीम पार पडली , निवेदने दिली गेली परंतु दारूमुक्तीत अडथळा आल्याच्या कारणावरून महास्वामीजी शुक्रवार दि.19/09/2025 रोजी आमरण उपोषण बसले असता विविध पक्षाचे राजकीय मंडळी, तहसिलदार साहेब व एक्साईज डिपार्टमेंट यांनी प्रत्यक्षात मतदान घेण्याचे आश्वासन दिल्याने तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले होते.
यानंतर महास्वामीजी हे रोज प्रत्येक गल्लीत जाऊन बैठक घेऊन बुधवारी सकाळी सर्व ग्रामस्थांनी मतदान करून दारू बंद करण्यासाठी बाटली आडवी करा व आपले भविष्य घडवा असे आवाहन करीत आहेत. या बैठकीस उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असून यात महिलांचा मोठा सहभाग आहे. महास्वामीजींच्या सोबत नंदगावचे सरपंच शशिकांत नागीले, माजी पं.स.सदस्य सिद्धेश्वर कोरे दशरथ काटे सर, विनोद पाटील, गजानन मोरे, सतीश काटे, गुलाब सुरवसे, परमेश्वर चिनगुंडे, शेखर कलशेट्टी , सचिन कोरे , तंटामुक्त अध्यक्ष मल्लिनाथ पाटील,ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत अरबळे,पोलिस पाटील किरण भाले, माजी सरपंच श्रद्धांनंद कलशेट्टी,बसवराज हालसे,सागर पाटील आदी मंडळी पुढाकार घेऊन परिश्रम घेत आहेत.






