नंदगाव (शाम नागिले) तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील दारूमुक्त गावासाठी विरक्त मठाचे मठाधिपती राजशेखर महास्वामीजी यांच्या आमरण उपोषणानंतर ग्रामस्थांचे विशेष ग्रामसभेत मतदान घेण्याचे ठरल्या प्रमाणे आज बुधवार दि. 24/09/2025 दारू बंदीच्या विशेष ग्रामसभेत माहीलाच्या विक्रमी व वाजवी मतदानाने दारू बाटली आडवी झाली .
या बाबत सविस्तर व्रत असे की, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे दारूबंदी साठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्या नुसार आज बुधवार दि:- 24/09/2025 च्या ग्रामसभेचे अध्यक्ष पद गावाचे सरपंच शशिकांत बळीराम नागिले याचे भूषवित ग्रामसभेस सुरुवात केली व गावातील सरसकट दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य कोमलबाई सुधाकर काटे यांनी सुचविले तर त्यास नंदाबाई मल्लिनाथ कामशेट्टी यांनी अनुमोदन दिले व ग्राम सभेस सुरुवात झाली. या ग्रामसभेत महिलांनी पुढाकार घेत विक्रमी संखेने उपस्थिती लावली .नंदगाव मधील महिलांची मतदार संख्या 1876 इतकी असून या पैकी 50% महिलांचे मतदान गरजेचे होते. परंतु आज 1100 च्या वर महिलांनी विक्रमी मतदान करत नंदगाव मधील दारू बाटली आडवी केली. या ग्राम सभेस महिला व पुरुषांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिल्याने ही दारू बंद करण्यास कोणतेही अडचण निर्माण झाली नाही .
या ग्राम सभेसाठी पंचायत समिति गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे साहेब, A BDO सिमा गवळी मॅडम, विस्तार अधिकारी तांबोळी साहेब ,कळसाईत दादा साहेब, गायकवाड साहेब ,ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रेड्डी साहेब व नंदगाव गावचे सचिव राहुल कांबळे साहेव त्यांची टिम मोकासे साहेब ,पाटील साहेब, जमादार साहेब, नरहरि कांबळे साहेब,नितिन कांबळे साहेब,घोगरे साहेब,धड्डे साहेब,लक्ष्मण कांबळे साहेब,अविनाश खुंटेगावे साहेब, एक्साईज ऑफिसर बांगर साहेब,कांबळे साहेब,कोरे साहेब व त्यांची टिम यांनी हे काम पाहिले व नंदगाव गावाचे माठाधिपती राजशेखर महास्वामीजींच्या सोबत नंदगावचे माजी पं.स.सदस्य सिद्धेश्वर कोरे दशरथ काटे सर, विनोद पाटील, गजानन मोरे, सतीश काटे, गुलाब सुरवसे, परमेश्वर चिनगुंडे, शेखर कलशेट्टी , सचिन कोरे , तंटामुक्त अध्यक्ष मल्लिनाथ पाटील,ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत अरबळे,पोलिस पाटील किरण भाले, माजी सरपंच श्रद्धांनंद कलशेट्टी,बसवराज हालसे,सागर पाटील,मल्लिनाथ गुड्डे, मेजर पंडित वाघमारे ,ब्रम्हानंद माने,विशाल मुकदान ,इरांना वाले,आशा ताई ,अंगणवाडी सेविका,शिक्षक वृंद ,गावातील तरुण युवक व आजी माजी सरपंच ,उपसरपंच ,सदस्य गावातील मतदार आदी मंडळी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले.






