वागदरी (एस.के.गायकवाड):- तुळजापूर तालुक्यातील (जिल्हा धाराशिव) नळदुर्ग,वागदरी, दहिटणा व परिसरात सतत संततधार पावसाने मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला असून अतिवृष्टीमुळे नळदुर्ग बोरी नदीला महापूर येऊन दहिटणा तालुका तुळजापूर येथील एका ‘शेतकऱ्याच्या दोन म्हशी पुरात वाहून गेल्या तर एक म्हैस वीज पडून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली असून या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती असी की परतीच्या पावसाने गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.दोन-तीन दिवस पावसाने उघङीप दिल्याने नुकतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, शिव सेना ( उबाठा ) चे प्रमुख माजी मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे सह अन्य मंत्र्यांनी सोलापूर,धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्याचा पाहणी दौरा आटोपून ते परत जातात न जातात तो पर्यंत दोनच दिवसात दिनांक २७ सप्टेंबर २o२५ पहाटे तीनच्या सुमारास पावसाने अचानकपणे मोठ्या प्रमाणात हाजेरी लावून पूर्ववत उग्ररूप धारण केले सतत संतत धार पावसामुळे परत एकदा तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग बोरी नदीला महापूर आला येथील बोरीधरण, खंडाळा प्रकल्पा सह व छोटी मोठी सर्व साठवन तलाव भरून मोठ्या प्रमाणान अतिरिक्ता पाणी सांडव्या वाटे बाहेर पडल्याने बोरी नदी, खंडाळा नदी नाले ओसांडून वाहू लागले यामुळे सर्वच मार्गावरून येणारे पाणी बोरी नदीच्या पुरात मिसळून एक मोठा महापूर तयार झाला या बोरी नदीच्या महापुराने पुनश्च एकदा नदीकाठच्या शेतकऱ्याचे शेतातील खरीप हंगामातील सोयाबिन सह अन्य पिके माती सगट वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या महापुरामध्ये दहिटणा ता.तुळजापूर येथील आप्पासाहेब बिराजदार यांच्या नदीकाठी असलेल्या दोन म्हशी महापुरामध्ये वाहून गेल्या तर एका म्हशीवर वीज पडून ती जागीच मृत्यु पावली असून आप्पासाहेब बिरादार यांच्या शेतातील घरात पाणी शिरून अन्नधान्य संसार उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेची माहीती मिळताच तुळजापूर विधान सभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवच्या अप्पर जिल्हकारी ज्योती पाटील,तुळजापूर तहसिलचे तहसिलदार आरविंद बोळंगे, नळदुर्ग अप्पर तहसिल कार्यालयाचे तहसीलदार प्रविण गायकवाड, मंडळ आभिकारी पवन कोकरे, अमर गांधिले, तलाठी महादेव गायकवाड, आकांक्षा वाघमारे, सहाय्यक कृषी आधिकारी यू.टी.कार्ले, आदी प्रशासनातील आधिकारी व कर्मचारी यानी दहिटणा येथिल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व भयभीत झालेल्या ग्रामस्थांना भेटण्यासाठी थेट दहिटणा गावाला खेटून जाणाऱ्या बोरी नदीच्या काठावर जावून भेट देवून चौकशी करून ग्रामस्थाना मानसिक आधार दिला. या प्रसंगी नुकसानग्रस्थ शेतकरी व ग्रामस्थासी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या की, पाऊस थांबल्या नंतर लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्थाना शासनाकडून अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. बोरीनदीच्या पलिकडे असलेल्या शेतकऱ्याना गावातून शेताकडे जाण्या येण्यासाठी बोरी नदीवर अक्कलकोट तालुक्यातील तुळजापूर अक्कलकोट सिमा रेषेवर वसलेल्या काजीकणबस कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला जोडणारा पूल बांधण्याची गरज असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल.
यावेळी भाजपाचे सिद्धू अण्णा कोरे भिवा इंगोले,विलास, अँड. अशिष सोनटक्के,महादेव सालगे,कल्याण बिराजदार,किशोर धुमाळ,प्रमोद सोमोसे,अनिल पवार,आरपीआय (आठवले)चे एस.के.गायकवाड सह शेतकरी ग्रामस्था उपस्थित होते.,






