spot_img
spot_img
spot_img

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी रिपाइं (आठवले) सह ग्रामस्थांची मागणी : धाराशिव जिल्हाधिकारी यांची जवळगाव (मे) गावाला भेट दिली असता सदर मागणी चे दिले निवेदन

वागदरी ( एस.के. गायकवाड ):

अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यात धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार

पुजार यानी तुळजापूर तालुक्यातील जवळगा (.मेसाई)या गावाला भेट दिली असता,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमापी करून सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन रिपाइं (आठवले) सह ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.

दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मेसाई) या गावाला भेट देऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांरी व ग्रामस्थांची चौकशी केली केली. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ) चे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के सह ग्रामस्थांनी विविध मागण्याचे निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी त्यावेळी त्याचप्रमाणे होणारा मेसेज जवळगा जोडणाऱ्या रस्त्यावर होनाळा जवळ असलेल्या पुलाची उंची वाढवून दळणवळणासाठी हा रस्ता सुरळीत करून द्यावा, जावळगा ते खंडाळ रोड तुळजापूर ते लातूर रोडला जोडावा,मेसाई जवळगा येथील दलित स्मशानभूमीचे बांधकाम करून द्यावे यासह विविध अन्य महत्वाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, माजी उपसरपंच दादासाहेब चौधरी, सचिन लोखंडे,शाहू लोखंडे माजी सरपंच,आप्पाराव लोखंडे पोलीस पाटील रजनीकांत भुसार नागनाथ ननवरे, बाबासाहेब इंगळे,काकासाहेब शिंदे गोविंद जगताप सह ग्रामस्थांच्या सह्या आहेत यावेळी जवळगा मेसाई सज्जाचे मंडळ अधिकारी तलाठी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या