spot_img
spot_img
spot_img

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार राणा दादा

वागदरी ( एस.के.गायकवाड ):

परतीच्या पावसाने गेल्या पंधरा-वीस दिवसापासून सतत संततधार पाऊस पडून अतिवृष्टीने तुळजापूर तालुक्यातीलच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची तात्काळ अर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील काही गावांच्या भेटी दौऱ्यात शेतकऱ्याशी व ग्रामस्थांची बोलताना केले.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे वडील माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे सध्या वर्धापकाळी आजारी आहेत. एका डोळ्यात वडील आजारी असल्याचे दुःख तर दुसऱ्या डोळ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्याचे दुःख घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या वागदरी, दहिटणा, गुजनूर,शहापूर, खुदावाडी,अणदूर व चिवरी पाटी आदी गावांचा पहाणी दौरा केला. या दौऱ्या दरम्यान ते शेतकऱ्यांशी बोलताना म्हणाले की पाऊस कमी झाल्यानंतर तातडीने शासकीय पातळीवर सर्व शेतकऱ्यांच्या शेतात बांधापर्यंत जाऊन पिक पंचनामा करून एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना तात्काळ शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असे सांगून त्यानी शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे मनोधैर्य वाढवले.

या प्रसंगी भाजपचे अँड. दिपक दादा अलूरे, प्रभाकर मुळे,सिध्दू आण्णा कोरे, साहेबराव घुगे, विलास राठोड,माहादु सालगे किशोर धुमाळ, विवेकानंद मेलगिरी,दामाजी राठोड, भिवाजी,इंगुले,उमा गोरे,सचिन घोडके,हारिश पाटील,कल्याण बिराजदार सह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या