वागदरी (एस.के.गायकवाड):-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तुळजापूर शहर शाखेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६८ वा वर्धापन दिन रिपाइं चे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. या प्रसंगी लढवय्य पँथर रिपाइं चे माजी तालुका अध्यक्ष कै. सूर्यकांत दांडे याचे चिरंजीव मनोज (भैंया) सुर्यकांत दांडे यांनी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांच्या नेतत्वाखालील रिपब्लिकन पक्ष्यात प्रवेश केला असून त्यांची रिपाइं (आठवले) च्या तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर तानाजी उमाजी कदम यांना
तालुका कार्याध्यक्ष पदा वरून जिल्हा सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आलीआहे.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करत पेढे वाटून मोठ्या उत्साही वातावरणान घोषणबाजी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६८ वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी रिपाइं (आठवले) चे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के,जिल्हा उपाध्यक्ष प्रताप कदम,बाबासाहेब बनसोडे,जिल्हा सचिव एस.के. गायकवाड,जिल्हायुवक
कार्याध्यक्ष धम्मशील कदम,शहराध्यक्ष वैजिनाथ पंडागळे,तालूका उपाध्यक्ष किसन पांडागळे, तालूका सचिव सुरेंद्र सुर्यवंशी,रिपाइं कामगार आघाडीचे तालुका अध्याक्ष आप्पा कदम,जेष्ठ कार्यकर्ते तथा बोरी गावचे माजी सरपंच चोकोबा शिरसाट,रिपाइं ओबीसी आघाडीचे तुळजापूर शहराध्यक्ष
लहू घोडके,नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे,संदीप कदम,महेश इंदापुरे, विठ्ठल शिंदे,आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






