spot_img
spot_img
spot_img

दलित पॅंथर संघटनेमार्फत आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांना निवेदन

(अजिंक्य मस्के पुणे प्रतिनिधी)

काल दि.३ऑक्टोबर रोजी खडकीतील विविध प्रश्नांवरती छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे युवा आमदार मा. सिद्धार्थ दादा शिरोळे यांची खडकीतील युवक कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेत खडकी परिसरातील महत्वाच्या एकूण तीन मुद्द्यांवर चर्चा केले प्रथम १) रेंजहिल्स येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्केट परिसरात *आण्णा भाऊ साठे यांचा अर्ध्या कृती पुतळा उभारण्यात यावा यावर चर्चा झाली…

२) संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्ष सोहळा प्रसंगी जुना मुंबई पुणे हायवे येथील “संविधान चौक” रस्ते विकास कामनिमित काढण्यात आला होता या *संविधान चौकाचे* पुन्हा सुशोभीकरण करून येणाऱ्या २६नोव्हेंबरला भव्य दिव्य संविधान फलक उद्घाटन सोहळा साजरा करावा.

३) पुणे मुंबई हायवे लगत खडकी पोलीस स्टेशन समोर देशाचे प्रतीक अस्मिता आपल्या भारतीयांचा मान असलेला भव्य तिरंगा ध्वज दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी उभारण्यात यावा यातून वाढेल *छत्रपती शिवाजी नगर मतदार संघाची शान आमदार साहेब खडकी कर नागरिकांचा मिळून द्या उभारून भव्य तिरंगी झेंड्याचा मान* अशी संकल्पना आमदार साहेबांकडे मांडत या राष्ट्रध्वज उभारणीसाठी *#MISSION TIRANGA AT KHADKI 2626#* या तीनही मागण्या खडकीतील महत्वाच्या असून आमदार साहेबांनी व्यवस्थित पने ऐकून घेत आमच्या पत्रावर रिमार्क देत लवकरात लवकर पाठपुरावा करत तीनही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

सर्व मागण्या या संविधानिक असून याचे अवचित्त साधून आमदारांना भारतीय संविधानाची प्रत देत तुमच्या हातून हे सामाजिक कार्य घडो अश्या सदिच्छा मुख्य मागणी कर्ते म्हणून विशालभाऊ ओव्हाळ/ अभिजीतभाऊ गडांकुश/राहुलभाऊ अवचिते यांनी व्यक्त केली.

*यातून एक खडकीकर नागरिक म्हणून माझी सर्व खडकीकर वासीयांना नम्र विनंती व आवाहन आहे की खडकीतील या मुख्य मागणीचे समर्थन करत आमच्या मागे भक्कम पने उभे रहावे कारण या मागण्या मान्य होताच आपल्या खडकीला मनाचा तुरा ओवला जाणार आहे*……

Related Articles

ताज्या बातम्या