वागदरी(एस.के.गायकवाड):
दि. ०६ अक्टोबर २०२५ रोती गांधी विद्यालय चिखली जिल्हा धाराशिव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत जवहार कनिष्ठ महाविद्यालय आश्रम शाळा बावी ता. जिल्हा. धाराशिव मेथील मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम कृमांक पटकावला आहे.
गांधी विद्यालय चिखली येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातून ८ तालुक्यांनी सहभाग घेतला यामध्ये १४ वर्षे वयोगट १७ वर्षे वयोगट व १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत जवाहर कनिष्ठ महाविद्यालय बावी येथील १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने धाराशिव तालुक्याचे नेतृत्व करून दिमाखदार खेळ दाखवत अंतिम सामन्यासाठी पात्र होऊन अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघ कळंब या संघावर तब्बल १७ गुणांनी मात करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मानमिळविला. बावी आश्रम शाळेच्या यशस्वी संघाला जिल्हा क्रीडा कार्यालय धाराशिव व गांधी विद्यालय चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या हस्ते ट्राफी देऊन गौरव करण्यात आला.बावी आश्रमशाळा संघाचे संघप्रमुख कृष्णा राठोड सुमित राठोड शुभम जाधव यांनी विजयी संघासाठी उल्लेखनीय योगदान दिले.विजयी खेळाडूंना क्रिडा शिक्षक औदुंबर जगताप राम घोडके कांचन आरवत यांनी मार्गदर्शन केले. नेत्रदिपक यशामुळे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री विद्यानंद मनोहरराव राठोड प्राचार्य दयानंद मनोहरराव राठोड प्रशासकीय अधिकारी जगताप बी.यू. शाळेचे पर्यवेक्षक साकळे बी.एस.यांनी सहभागी सर्व यशस्वी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.






