पुणे प्रतिनिधी. अजिंक्य मस्के
*सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका ७१ वर्षीय वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर देशासह राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यात हडपसर मंत्री मार्केट येथे दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भाऊ साळवे यांच्या नेतृत्वामध्ये रस्ता रोको व जोडे मारो असे तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.*
भारताचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे सुपुत्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे न्या. बी. आर. गवई यांच्यावर न्यायालयात झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे.
शासन पुरस्कृत धर्मांध शक्तींना मिळालेली मोकळीक आता थेट न्यायपालिकेवर हल्ला करत आहेत. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून भारताच्या सामाजिक समतेवर, संविधानावर झालेला हल्ला आहे. याचा निषेध करत दलित पॅंथर संघटने कडून आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून धर्मांध शक्तींना बळ देणाऱ्या व संविधानिक मूल्यांना कमकुवत करणाऱ्या सरकारचा, माननीय सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींचा निषेध करत त्या जातीवादी वकिलावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल व्हावा व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर दलित पॅंथर संघटना रस्त्यावर उतरून महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या वेळी आंदोलनास सहभागी सोलापूर जिल्हा अध्यक्ष बंडू गवळी, अक्कलकोट सरपंच श्रुती ताईभांगे, उरळी कांचन चे पुणे जिल्हा कार्यध्यक्ष अनिल साळवे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश अग्रवाल, अल्प संख्यक अध्यक्ष बब्बू बागवान, उत्तम पतारी संघटना अध्यक्ष उत्तम खंडागळे, संघटक प्रमुख हीरालाल जी अग्रवाल, सुल्तान भाई बागवान, महिला आघाडी अध्यक्ष पुष्पा ताई अग्रवाल, जनसंपर्क प्रमुख अजिंक्य मस्के पारधी समाज अध्यक्ष अश्विनी ताई पवार, जिल्हा पारधी समाज अध्यक्ष बाबू पवार, उपाध्यक्ष संजय पोटभरे,विशाल ओहळ,उपाध्यक्ष सुनील वारे,अजय वंडगल, युवा नेते कुणाल साठे
RPI पुणे शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे,
RPI पुणे शहर उपाध्यक्ष राहुल(डॉन) कांबळे
सुमित गायकवाड बुद्धिस्ट महाराष्ट्र राज्य,
फुलचंद चतुर सर, भीमराव बनसोडे,
आशिष आल्हाट सरचिटणीस RPI हडपसर विधानसभा
गुड्डू भाई अंसारी, संजू कुमार, सुनील कुमार, सुनील सेठ जैन, संतोष भाऊ शेरकर, सिंग साहब, मंजर भाई सईद, लकी सेट, राहुल सेठ, रामकुमार जायसवाल, जोशी सेठ, शिवा कुमार,
भारती गायकवाड,शोभा तोंडकर, मंदा यमहारणे,जया शिंदे,रतना वारे,आईल्हाया गावडे,जनाबाई गायकवाड,अनू पांत्याब,पार्वती गायकवाड,अणिता पालाळ,शाणिबाई जाधव,दिया गायकवाड,मंगलाबाई चिनचोरे,पार्वती गायकवाड,सविता घाडगे, प्रेम शिंदे,शिवम खरात्,विजय सांबू,कबिर बागवान, राजू पठाण
सत्यजित निंबाळकर
व आदी दलित पँथर संघटनेचे प्रमुख पदाधिकारी समाजातील अनेक नेते मंडळी मोठया संख्येने
उपस्थिती होते.






