spot_img
spot_img
spot_img

नेत्र रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो : अनंद काटकर 

नेत्र रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो : अनंद काटकर

वागदरी (एस.के.गायकवाड ):

नेत्ररोग चिकित्सा अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात जिल्हा परिषद धाराशिव च्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब नेत्र रुग्णाची सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी हजारो नेत्र रुग्णांना मोतीबिंदू सारखे आजारावर उपचार करून त्यांना दृष्टी देण्याचे कुशल कर्म करू शकलो हे मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन नेत्ररोग चिकित्सा अधिकार म्हणून सेवानिवृत्त झालेले अनंत काटकर यांनी नळदुर्ग ता.तुळजापूर येथे आयोजित सत्काराप्रसंगी बोलताना केले.

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील मूळ रहिवासी असलेले आनंद काटकर यांनी काही काळ उदगीर येथे तर प्रदीर्घकाळ तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग,अणदूर, जळकोट,सलगरा (दिवटी ) आदित ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल ३१ वर्ष नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणून गोर गरीब सामान्य नेत्र रुग्णाची सेवा केली. या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी हजारो नेत्र रुग्णांना मोतीबिंदू सारख्या रोगावर उपचार करून दृष्टी देण्याचं कुशल कर्म करून ते शेवटी उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग येथून नेत्र रुग्ण चिकित्सा अधिकारी म्हणून नुकतंच सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नळदुर्ग येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने रिपाइं (आठवले)चे नळदुर्ग शहराध्यक्ष तथा शिक्षण संस्थेचे संस्थाक मारूती खारवे यांच्या अध्यक्ष ते खाली त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

यावेळी रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे जिल्हा सचिव एस के गायकवाड रिपाइं (आठवले) चे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे तालुका उपाध्यक्ष महादेव कांबळे भाजपा मीडिया सेलचे तालुका अध्यक्ष पत्रकार किशोर धुमाळ सह कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी शुभेच्छा देताना बाबासाहेब बनसोडे म्हणाले की अनंत काटकर साहेबामुळे माझ्या डोळ्याच्या डोळ्याच्या मोतीबिंदूवर आजारावर यशस्वी उपचार केल्यामुळे आज मी त्यांचा हा सत्कार सोहळा उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याने मला मनस्वी आनंद होत आहे.याप्रसंगी अरुण लोखंडे मारुती खारवे,एस के गायकवाड आदींची ही शुभेच्छा पर भाषणे झाली.

Related Articles

ताज्या बातम्या