spot_img
spot_img
spot_img

शासनाने कुस्ती मल्ल्यांना अवश्यक ते सविधा मिळवून द्यावा : – मधुकरराव चव्हाण 

नळदूर्ग बालाघाट कॉलेज मध्ये अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा संपन्न 

नळदुर्ग दादासाहेब बनसोडे 

शासनाने कुस्ती पट्टूंना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे असे मत माजी आमदार तथा माजी मंत्री मधुकराव चव्हाण यांनी आज येथील महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने व येथील बालाघाट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. सदर कुस्ती स्पर्धेच्या आजच्या अंतिम दिवशी विविध वजन गटातून विजयी झालेल्या मल्लांना माजी आमदार मधुकराव चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी तर प्रमुख उपस्थिती बालाघाट शिक्षण संस्थेचे सहसचिव लिबराज कोरेकर, संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण, कॅप्टन बागल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांची होती.

२२० मल्लांनी आपापल्या कसरती व डावपेचांचा प्रदर्शन करीत प्रेक्षकांची मनं जिंकली.

तर ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७८, ८६ , ९२, ९७ १२५ किलो वजनातून एकंदरीत २० मल्लांनी सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. या यशस्वी मल्लांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सुवर्ण पदक मिळवण्याऱ्या पैकी दिगंबर पाटील, प्रांजल भरेतीया, शनिराज निंबाळकर‌, विपुल थोरात, आयेशान शेख, साहिल सय्यद, संदीप लटके,

आदित्य कांबळे, अमोल दिंडे,

रोहन पवार तर रौप्य पदक मिळविणाऱ्यात कृष्णा रक्ते, कौशिक शेख, युवराज वाघ, मनोहर मुंडे, मारूती शिंदे, जय जाधव, दयानंद घोगरे, संभाजी देवकर, उदयसिंह खांडेकर, विकास तावरे या मल्लांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, सुत्रसंचलन डॉ. संतोष पवार तर आभार प्रा. डॉ. कपील सोनटक्के यांनी मानले.

यावेळी शहाबाज काझी व बाबुराव चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या महाविद्यालयातील मल्ल रोहन पवार यांनी १२५ वजन गटातून सुवर्ण पदक मिळविल्याने माजी आमदार मधुकराव चव्हाण यांच्या हस्ते रोख अकरा हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आले.

पंच म्हणून प्रा. धनराज भूजळळ, प्रा. डॉ. मंगेश डोंगरे, प्रा. राम विधाते, प्रा. हरि मस्के, प्रा. बालाजी भूरंगे, प्रा. सोमनाथ काबीले, प्रा. विजयसिंह बारवाल यांनी काम पाहिले.

यावेळी क्रीडा शिक्षक प्रा. डॉ. कपील सोनटक्के, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, प्रा. डॉ अशोक कदम, प्रा. मोतीराम पवार, डॉ. शिवाजी घोडके, प्रा. डॉ. हंसराज जाधव, प्रा. सूजीत कटारे, प्रा. परवेझ पिरजादे, मैनोद्दीन शेख, माजी नगरसेवक सुधीर हजारे, अझहर जहागिरदार, अख्तर काझी, शिवाजी वऱ्हाडे, अणदूरचे माजी सरपंच धनराज मुळे, अप्पू घुमरे, भास्कर सुरवसे, सुरेश गायकवाड, शरद बागल, मानीक राठोड, सिद्धू सुतार, यांच्यासह नळदुर्ग शहरातील व परिसरातील कुस्तीचे जाणकार, गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत असलेल्या जालना, बीड, धाराशिव व श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७१ महाविद्यालयातील कुस्ती पट्टूंनी सहभाग नोंदविला.

Related Articles

ताज्या बातम्या