वागदरी (एस.के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या खुदावाडी पंचायत समिती गणातून भाजपा व मित्रपक्षाच्या महायुतीकडून वागदरी ता. तुळजापूर येथील भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते किशोर लक्ष्मण सुरवसे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )व शिवसेना (उबाठा ) महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार ) पक्षाचे येडोळा ग्रा.प. चे माजी सरपंच पद्माकर मधुकर पाटील हे संपूर्ण ताकतीनिशी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
महायूतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले वागदरी ता.तुळजापूर येथील किशोर सुरवसे हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून सन २०२४ ला आमदार राणा दादा यांच्या मार्गदर्शनाखाली गावात आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.या शिबिरात ८५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. केंद्रसरकार व राज्य साकार यांच्या कडून राबविण्यात
येणाऱ्या शासकीय योजनेचा सामान्य जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयात्नशिल असतात गावातील जवळपास १०० लाडक्या बहिणींचे फार्म स्वतः चा मोबाईलवर विनामूल भरून त्याना या योजनेचा लाभ मिळवून दिला. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी उदाहरणार्थ पीक विमा असेल अनुदान असेल किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांचे फॉर्म भरून घेतले. भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी प्रकियेत सक्रिय सहभाग घेऊन खुदावाडी पंचायत समिती गणात प्रत्येकाच्या घरी जाऊन सर्वाधिक सदस्य नोंदणी केली. शासनाच्या सर्व योजनांची माहिती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम ते जाणीवपूर्वक करतात महायुतीच्या माध्यमातून भाजपाच्या वतीने पक्षश्रेष्ठीने संधी दिली तर आपण खुदावाडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवून विजय संपादन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तर याच खुदावाडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले येडोळा गावचे माजी सरपंच पद्माकर पाटील हे देखील सतत जनतेच्या संपर्कात असतात त्यांनी सुन २०१८ ते २०२३ दरम्यान सरपंच म्हणून काम करत असताना येडोळा गावातील डवरी गोसावी भटक्या विमुक्त समाजातील वंचित लोकांना जवळपास १०० गरजू कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळवून देवून घरकुल योजनेत या ग्रामपंचायतीया राज्यात दुसरा क्रमांक पटकावला त्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून त्यांचा सन्मानही करण्यात आला.
गावात अंतर्गत सिमेंट रस्ते पाणी लाईट गटारीचे कामे आधी विविध विकासकामे राबवून गावाच्या विकासाला गती दिली. महाविकास आघाडी कडून संधी मिळाल्यास आपण खुदावाडी पंचायत समिती गणातील प्रत्येक गावाचा सर्वांगीन विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार केला आहे.
तिकीट कोणाका मिळेना पण या पंचायत समिती गणात महायुती विरुद्ध महाविकारा अघाडी मध्येचं सरळ सरळ लढत होणार असे चित्र आहे.






