पुरग्रस्त भागातील बेअर नागरीकांना
३०० शे किटचे वाटप
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
धाराशिव जिल्ह्यातील ३०० बेघर कुटुंबांना शेल्टर व आरोग्य किटचे वाटप अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटाने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना, समाजातील वंचित घटकांना आधार देण्यासाठी ““डोनेट कार्ट” आणि “कार्ड संस्था” यांच्या सहकार्याने दिशा समाज विकास संस्था यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ३०० गरीब आणि वंचित कुटुंबांना शेल्टर व आरोग्य किटचे वितरण करण्यात आले
या उपक्रमांतर्गत तुळजापूर परिसरातील भटके विमुक्त समाजातील गरीब कुटुंबांना आवश्यक जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वितरण कार्यक्रमास टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे ग्रामीण विकास तज्ञ श्री. गणेश चादरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. रामचंद्र आबा रोचकरी, श्री. विलास सरवदे, दिशा संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब वडवे, तसेच श्री. अमोल ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मदत मिळालेली प्रत्येक कुटुंबे ही अत्यंत गरीब, बेघर व वंचित स्थितीत असलेली असून, या मदतीमुळे त्यांना जगण्याचा दिलासा मिळाला आहे. गणेश चादरे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे ही केवळ दानशूरता नाही, तर मानवतेची खरी ओळख आहे.”दिशा समाज विकास% संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना तातडीचा आधार मिळत असून, समाजातील संवेदनशीलता आणि एकोपा पुन्हा अधोरेखित झाला आहे.”माणुसकीचा हात पुढे आला की आशेचा किरण प्रत्येक झोपडीत उजळतो” अशा भावनेने साकारलेला हा उपक्रम धाराशिव जिल्ह्यातील आपत्ती ग्रस्त कुटुंबांसाठी आशेचा नवा किरण ठरला आहे.






