spot_img
spot_img
spot_img

जळकोट येथील गणेश (दादा )सोनटक्के परिवाराकडून हजारो महिलांना साडी चोळी भाऊबीज भेट

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप नेते गणेश दादा सोनटक्के परिवाराच्या वतीने दीपावली सणाचे औचित्य साधून हजारो महिलांना साडी चोळी व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंतांचा भर आहेर देऊन सन्मान करण्यात आला. आपल्याबरोबर इतरांची देखील दिवाळी गोड व्हावी हाच या मागचा उद्दिष्ट ठेवून सर्वांना भरआहेर देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व आलेल्या महिलांनी मा. जिल्हा परिषद सदस्य गणेश दादा सोनटक्के यांना ओवाळणी करून आशीर्वाद दिला. भाजपाचे नेते गणेश (दादा ) सोनटक्के परिवारांच्या वतीने गेले 29 वर्षापासून जळकोट सह परिसरातील हजारो महिलांना दरवर्षी माहेरची साडी चोळी व फराळ देऊन भाऊबीज भेट देण्याचा कार्यक्रम करीत आहेत. यामध्ये यंदाच्या वर्षी गावातील बारा बलुतेदार आणि माथाडी कामगारांना भर पेहराव आहेर करून त्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच गावाचे सर्व सन्माननीय आजी-माजी शिक्षकांचा आजपर्यंत ज्ञानरजणाचं काम केल्याबद्दल स्मृतिचिन्ह घेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हजारो महिलांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रम अधिक आनंदीमय वातावरणामध्ये संपन्न झाला हा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल गणेश दादा सोनटक्के व त्यांच्या सर्व मित्र परिवारांचे आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश (दादा) सोनटक्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड .आशिष भैया सोनटक्के, रंजनाताई राठोड, राहुल काकडे, सविताताई सोनटक्के, यशवंत पाटील, दत्ता राजमाने, विलास राठोड, अतुल भोसले, शरद भोसले, नालंदा पाटील, मनोहर माने, संजय मोठे, तमन्नाप्पा माळगे, बाळासाहेब पाटील, अरुण लोखंडे, नागनाथ किलजे, संजय माने, संजय अंगुले, यांच्या सह परिसरातील कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या