वागदरी ( एस.के. गायकवाड ):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाची धाराशिव जिल्हा बैठक नुकतच येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ,यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी राजाभाऊ ओव्हाळ मार्गदर्शन करताना म्हणाले दि.३ नोव्हेबर २०२५ रोजी महाड येथे केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइं (आठवले ) पक्षाच्या ६८ व्या वर्धापण दिना निमित्तोने आयोजित राज्यव्यापी आधिवेशनास धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की नामदार रामदास आठवले यांच्या आदेशाने लोकसभा व विधानसभाच्या निवडणुकीत आरपीआय पक्ष भारतीय जनता पार्टी सोबत सहभागी होऊन सदरील निवडणुकात महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून मदत करीत आला आहे म्हणून आता आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायत च्या होऊ घातलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने धाराशिव जिल्ह्यातील रिपाइं (आठवले) पक्षाला सन्मानपूर्वक जागा वाटपात सन्मान देऊन सहकार्य करून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका महायुतीच्या माध्यमातूनच लढविण्यात याव्यात.त्या अनुसंघाने रिपब्लिकन कार्यकार्यानी कामाला लागावे असे ही आवहान त्यानी यावेळी बोलताना केले.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य मा.एस के चेले,मराठवाडा कार्याध्यक्ष आनंद पांडागळे,मराठवाडा विभाग उपाध्यक्ष भागवत शिंदे, मराठवाडा सचिव बंडूभाऊ बनसोडे,जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ ओहाळ,जिल्हा उपाध्यक्ष रणजीत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष संदिपान कांबळे ,जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,जिल्हा सचिव एस.के. गायकवाड,जिल्हा सचिव लखन ओहाळ, धाराशिव तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे, धाराशिव शहराध्यक्ष उदयराज बनसोडे,नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे,महिला आघाडी सौ.आशाताई कांबळे,सौ. उषाताई खंडागळे,सौ.सुमनताई गायकवाड,तुळजापूर तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे, तुळजापूर शहराध्यक्ष वैजिनाथ पांडागळे,युवक जिल्हा कार्याध्यक्ष धम्मशील कदम, लोहारा तालुकाध्यक्ष काकासाहेब भंडारे,युवक तालुका अध्यक्ष शुभम कदम,युवक तालुका कार्याध्यक्ष प्रदीप शिरसाठ, संघटन सचिव मुकेश मोठे,युवक नेते सूर्यनंद बनसोडे, रोहन दहिभाते सुहास झेंडे,कपिल ढगे, प्रवीण हुंबे, सौरभ लोंढे,महेश गायकवाड,अंकुश दत्ता बनसोडे, प्रतीक बनसोडे,आदीसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.






