नंदगाव (शाम नागिले ) तुळजापूर तालुक्यातील नंदगाव पासून लोहगाव मार्गे नळदुर्ग या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण काम गेल्या चार वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्यात चक्क फुले भरून गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले.
या बाबत सविस्तर व्रत असे की हा रस्ता बोळेगाव, कुन्सावळी, सिंदगाव, नंदगाव, लोहगांव मार्गे नळदुर्ग असा रस्ता आहे, गेली चार वर्षापूर्वी रस्ता डांबरीकरण कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली. तेव्हा काम चालू झाले व काही दिवसातच काम थांबले व तेव्हापासून रस्त्याचे काम अपूर्णच आहे. गुत्तेदाराने सुरवातीला रस्ता उकरून काही ठिकाणी खड्डी टाकली नंतर मात्र तो कामाकडे फिरकलाच नाही. अर्धवट काम, त्यातच जोरदार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे झाले आहेत.या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.अनेक ठिकाणी खडी उघडी पडली आहे. त्यामुळे रस्त्यावर प्रवास करताना वाहनधारकासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित बांधकाम विभागाकडे नागरिकांनी अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासानाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे चक्क फुलांनी भरून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात संख्येत वाढ होत आहे. बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष घालून रस्त्यांचे डांबरीकरण काम तात्काळ करावे अन्था आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ दबडे,माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार निजाम शेख, गुलाब नदाफ,लहू कांबळे,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित आहे.






