नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रभाग २ मधील एक कुशल व संघटनात्मक उमेदवार
———————————————-
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
भारतीय संविधानातील स्वातंत्र्य , समता , बंधुता , धर्मनिरपेक्षता आणि अखंडता या मुल्यांचा उल्लेख करत संविधान हे बळकट करण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत मानवाच्या कल्याणासाठी व आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव किंवा छाप सन्मानपुर्वक पडली पाहिजे . हेच ध्येय धोरण ठेवत प्रत्येक मानवी विचारांच्या हक्कासाठी न्यायासाठी व असुरक्षितता अन्यायाचा सामना करत आपणाला विचारांची लढाई करत मानवी विचार व विकासाचे निस्वार्थ व्यक्तीमत्व आहे .
छत्रपती शिवाजी महाराज संत शिरोमणी रोहीदास , फुले , शाहु , आंबेडकर , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे विचार जोपासत मानवाच्या मुलभुत गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याची जबाबदारी डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्य प्रवर्तक तथा रिपाइं आठवले गटाचे नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे हे चोख पणे पार पाडु शकतात , कारण खुप चांगले विचार संघटनात्मक बांधणी , सामाजिक कार्याची ओळख आसणारा , युवकांना मार्गदर्शन पर प्रोत्सहान करत सर्वांची मने जिंकणारा सर्वांशी दया – क्षमा – शांती प्रेम व आपुलकीचे नाते निर्माण करणारा कार्यकर्ता आहे शिवाय नळदुर्ग शहरात २ नंबर प्रभाग सर्वात मोठा मानला जातो .नळदुर्ग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रभाग २ मधील अनुसुचित जाती मधील खरा न्याय प्रविष्ठ लढवय्या उमेदवार म्हणून त्यांची ख्याती आहे
त्यांनी नळदुर्ग शहरात प्रथमच डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे रोपटे लावले त्यांचे रुपांतर वट वृक्षात होत आहे दर्जेदार शिक्षणाच्या समूहाच्या माध्यमातून गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्याचे काम मारुती खारवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे त्यांच्या पत्नी नळदुर्ग नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्ष पद सक्षम पणे संभाळल्या आहेत त्या वेळेस अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शिवाय विकास कामे ,गरीबा साठी आरोग्य , अन्न , वस्त्र , निवारा आणि शिक्षण या साठी मारुती खारवे प्रामाणिक प्रयत्न करत आसतात नळदुर्ग आणि परिसरात प्रत्येक समाजाच्या दुःखात व सुखात ते आग्रेसर आसतात मग तो गरीब आसो कि श्रीमंत असो पण प्रत्यक्षात प्राधान्य गरीबासाठी आसते हे तेवढेच खरे आहे .
धार्मिक क्षेत्रात खुप मोठे योगदान आहे शहरात किंवा शहरा बाहेरील गाव खेड्या बाहेरील बाजूस खुप मोठी छाप आहे , बौद्ध संस्काराचे महत्त्व सांगत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी विविध ठिकाणी बैठकी लावणे , बौद्ध विहारे स्थापन करणे दर रविवारी बौद्ध विहारात जाण्यासाठी युवकांना प्रोत्साहीत करणे .
प्रभागासाठी प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी अनेक शासकीय योजना आहेत त्या योजना खेचुन आणण्याची जबाबदारी संपूर्णपणे लोकप्रतिनिधींची आसते ती जबाबदारी पार पाडण्याची क्षमता मारुती खारवे यांच्यात आहे ते सक्षम पणे पार पाडु शकतात .
खरंतर महारष्ट्र ही संताची भुमी आहे
प्रत्येक संतानी व महापुरुषांनी मानवतेचा संदेश दिला प्रात्येक मानवाने आपण आपले पणाने वागावे समाजातील विषमता दुर करून निष्ठावंत कार्यकर्ता कसा जगला पाहिजे या कडे सर्वांचे लक्ष दिले पाहिजे अनुसुचित जाती प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत ही उमेदवारी आणि जनतेचा विश्वास ठाम भूमिका घेणार आहेत दावेदार उमेदवार म्हणून लोकांनी ही पसंती दर्शविली आहे .






