spot_img
spot_img
spot_img

अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर झालेल्या जातीय अत्याचाराच्या घटनेबाबत तातडीने कारवाईची मागणी

बेंबळी (ता. धाराशिव) परिसरात अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर झालेल्या जातीय वैमनस्यातून प्रेरित गंभीर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

ही घटना केवळ एका व्यक्तीवरील अन्याय नसून, सामाजिक समतेवर झालेला आघात आहे.

 

दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारास अरुण रेणप्पा माने, हे आपल्या शेताकडे मोटरसायकलने जात असताना उमरेगव्हाण–विट्ठलवाडी शासकीय रस्त्यावर जातीय सूडभावनेतून बाबा कुंडलिक खापरे यांनी सार्वजनिक रस्ता जाणूनबुजून अडवून जीवघेणा प्रकार घडवला. शासकीय शिवरस्ता 33 फुटाचा असताना त्याच्यावर अतिक्रमण करून रस्ता अरुंद करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले

रस्त्यावर पाणी सोडून चिखल करण्यात आला, झाडे तोडून रस्त्यावर टाकली, मोठे दगड (रस्त्यावर) ठेवून रस्ता खोदण्यात आला आणि वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.

या अडथळ्यामुळे अरुण माने यांची मोटरसायकल घसरून अपघात झाला व त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन दोन वर्षांपूर्वी तब्बल ३५ टाके पडले होते

ही घटना जातीच्या वैमनस्यातून आणि सूडभावनेतून घडवून आणण्यात आली आहे, असा ठाम आरोप अरुण माने यांनी आपल्या निवेदनात केला आहे.

घटनेनंतर बेंबळी पोलीस स्टेशनचे बीट आमलदार कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन अडथळा दूर करून रस्ता खुला केला, याचा स्पष्ट पुरावा उपलब्ध आहे.

परंतु या घटनेनंतरही संबंधित आरोपीविरुद्ध कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई आजपर्यंत झालेली नाही, ही अत्यंत खेदजनक आणि संतापजनक बाब आहे.

पोलिस प्रशासनाची ही निष्क्रिय भूमिका अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याकडे दुर्लक्ष करणारी आणि अन्यायाला पाठबळ देणारी आहे, असा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात आला आहे.

अरुण माने यांनी या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

“हा फक्त माझ्यावरचा हल्ला नाही, तर जातीच्या नावाने होत असलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्धचा माझा लढा आहे,” असे अरुण माने यांनी सांगितले.

परिसरातील दलित संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रबुद्ध नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून,

सदर आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तातडीने गुन्हा नोंदवून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

जर प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलली नाहीत, तर ही लढाई जनआंदोलनाच्या रूपात रस्त्यावर नेण्यात येईल, असा इशारा स्थानिक समाजघटकांनी दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या