शेतकऱ्यांच्या अंदोलन प्रसंगी शिवसेनचे नेते सोमनाथ गुड्डे यांची मध्यस्ती
———————————————-
नळदुर्ग प्रतिनिधी.दादासाहेब बनसोडे
तुळजापूर तालुक्यातील गोर गरीब शेतकरी रात्र नि दिवस शेतीमध्ये कबाड कष्ट करतात आणि शेती पिकवतात या शेती मधुन सर्व लागुड जाऊन शिल्लक राहीलेले पैसे हे आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वापरतात आतातरी निसर्गाने हाहाकार माजला मे महिन्या पासून ते अक्टोबर पर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपले शेतीचे खुप मोठे नुकसान केले आशा परिस्थितीत मौजे नंदगाव लोहगाव , सिंदगाव , कुन्सावळी बोळेगाव , बोरगाव , सलगरा [ मंड्डी ] येथील शेतकरी मातोश्री शेतकरी सहकारी साखर कारखान्याने २०२३ व २०२४ उसाचे थकीत बिल काढलेच नाही यांच्या निषेधार्थ अंदोलन उभा केले यावेळी नंदगाव गटातील जिल्हा परिषद गटातील उमेदवार तथा पुर्ण वेळ कार्यकर्ते शिंदे गटाचे नेते सोमनाथ गुड्डे यांनी शेतकऱ्यांना पाठींबा देत मातोश्री साखर कारखान्याचे प्रमुख माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्याशी दुरध्वनी मार्फत संपर्क साधुन येत्या १० ते २० तारखे पर्यंत थकीत बिल
तात्काळ देण्याचे विनंती केली त्यावेळी सिद्धराम म्हेत्रे यांनी थकीत बिल लवकरात लवकर पूर्ण देऊ आसे बोलून शेतकऱ्यांना दिलासा दिला यामुळे शिवसेनेचे नेते नंदगाव गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ गुड्डे यांनी अंदोलन प्रसंगी मध्यस्ती करून शेतकऱ्यांना प्रामाणिक न्याय मिळवून दिला आहे यामुळे सोमनाथ गुडडे यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे .






