spot_img
spot_img
spot_img

तुळजापूरच्या गुन्ह्यात सेशन कोर्टाचा मोठा निर्णय:  महिलेवर अत्याचाराच्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास

तुळजापूर, १२ नोव्हेंबर २०२५

  • येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज एका महत्त्वपूर्ण निकालात, महिलेवर अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) एस.जी. बनसोडे यांनी केला होता, तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सर) आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत (मॅडम) यांचे मोलाचे मार्गदर्शन तपासादरम्यान लाभले. आहे 

काय आहे नेमके प्रकरण?

पीडित महिला तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले. आरोपीने हे व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन पीडितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला होता. या गंभीर घटनेनंतर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुरनं ३३२/२०२१ अन्वये भादंवि कलम ३७६, ३७६(२)(एन), ३८४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन:

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, तत्कालीन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तपास अधिकारी पीएसआय एस.जी. बनसोडे यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन केले. बनसोडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास करून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले, जे न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरले.

न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल:

आज, १२ नोव्हेंबर २०२५ रोजी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.जी. देशमुख यांच्या न्यायालयात या खटल्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. न्यायालयाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले आणि खालीलप्रमाणे कठोर शिक्षा सुनावली:

कलम ३७६(२)(एन) भादंवि: १० वर्षे सश्रम कारावास व १०,००० रुपये दंड. (दंड न भरल्यास ५ दिवस साधा कारावास)

कलम ३२३ भादंवि: ६ महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड. (दंड न भरल्यास दोन आठवडे साधा कारावास)

कलम ५०६ भादंवि: १ वर्ष सश्रम कारावास व २,००० रुपये दंड. (दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास)

सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या असून, आरोपीला एकूण १२,५०० रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या खटल्यात शासकीय अभियोक्ता श्री एम.जी. देशमुख यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. तसेच, पोलीस ठाणे, तुळजापूर येथे नेमणुकीस असलेले पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल/१३६० एम.टी. पाटोळे यांनी न्यायालयीन कामकाजादरम्यान आवश्यक पाठपुरावा केला. पोलीस दलाच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे पीडितेला न्याय मिळाला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या