वंचित बहुजन पक्षाच्या वतीने नगर परिषदेच्या सर्वच जागा लढवणार
———————————————-
नळदुर्ग:दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहराच वातावरण पाहाता विकासाची कामे केवळ ढोंगी पणाचे लक्षण आहेत विकासाच्या नावाखाली अनेकांनी किसे भरले हा गाव विकास नव्हता या सत्ताधाऱ्यानी या देशाचं वाटोळे केले आशा सत्ताधाऱ्याला जागा दाखविण्याची वेळ आली आहे वंचित बहुजन आघाडी सर्व ताकतीनिशी नगर परिषद निवडणूकीत उतरणार आसुन फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी आणि संविधानाच्या चौकटीत राहुन सम विचारी पाक्षाशी आम्ही नाळ जुळवणार आहोत ज्या पक्षाशी नाळ जुळेल त्याच पक्षाशी आम्ही यूती करणार आसल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ नितीन ढेपे यांनी व्यक्त केले
नळदुर्ग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निवडणुकी संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळेस ते बोलत होते
यावेळी प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आर एस गायकवाड यांनी केले यावेळी नळदर्ग शहरातील युवक ओमकार कलशेट्टी , गणेश कलशेट्टी , अमर कलशेट्टी , साहेबलाल शेख , फैयाज शेख , शैलश डुकरे , माल्लिनाथ होनाळे , सचिन कलशेट्टी , सुरज जाधव , राहुल राठोड , अभिजित पाटील आदिनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला .
यावेळी पत्रकार परिषदेस नगर परिषद निवडणूक विषयक चर्चा करण्यात आली तुळजापुर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे , तालुका प्रभारी गोविंद भंडारे , युवा उपाध्यक्ष सहदेव कांबळे , युवा नेते विनायक दुपारगुडे, तुळजापूर तालुका महासचिव गौतम गायकवाड , माजी पी एस आय ज्ञानदेव बनसोडे नळदुर्ग शहर अध्यक्ष शामसुंदर (भैय्या) लोखंडे , सचिन युवराज राठोड सह वंचित बहुजन आघाडीचे तुळजापूर तालुका कार्यकारिणी सदस्य नळदुर्ग शहरातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कार्यकर्ते उपस्थित होते






