नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक २ मधुन सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .
नळदुर्ग नगर परिषद प्रभाग निहाय होऊ घातलेल्या अनुसुचित जाती नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक २ मधुन सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती सुदाम खारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .
मारुती खारवे हे नळदुर्ग शहरात अनेक विधायक कार्यक्रम राबवून समता बंधुता आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते आग्रेसर आसतात त्यांनी नळदुर्ग शहरात नविनच शिक्षण समूह निर्माण करून नळदुर्ग येथील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत चांगले व दर्जेदार शिक्षण देण्याचे खुप मोठे कार्य दिले आहेत सलग ६ वेळेस डॉ आंबेडकर इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी नळदुर्ग केंद्रा सर्कल मध्ये प्रथम ,द्वितिय आणि तृतीय येण्याचा मान मिळविला आहे
डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल काढून विद्यार्थ्यांना संजिवनी मिळाली आहे .
सामाजिक कार्य आसो , सर्वांच्या सुखास दुःखात सहभागी होऊन ते कार्य पुर्ण करतात त्यांचा सामाजिक व शैक्षणिक कार्याशी नाळ जुळलेली आहे . त्यांच्या सुविध पत्नी लक्ष्मी मारुती खारवे ह्या नळदुर्ग नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर त्यांनी वार्डात अनेक योजना व विकास कामे राबविली आहेत ते सतत संविधानाच्या चौकटीत राहून नियमावर बोट ठेवत
ते निखळ काम करतात ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नळदुर्ग शहराध्यक्ष म्हणून अनेक वर्ष झाली काम पाहातात या सर्व कार्यशी सर्वच नळदुर्ग करांना चांगलीच ओळख आहे .
मारुती खारवे हे प्रभाग क्रमांक २ मधुन अनुसुचित जाती नगर सेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उदा दि १७ नोहेंबर अर्ज दाखल करण्याची शेवट तारीख आहे
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी नळदुर्ग तहसिलचे अप्पर तहसिलदार प्रमोद गायकवाड , नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर , नायब तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी घृणेश्वर स्वामी हे काम पाहात आहेत .
अर्ज दाखल करताना स्वतः उमेदवार
मारुती खारवे , रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे ,
सचिव एस के गायकवाड , तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे , जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के , शिवसेना उभाठा चे नेते सरदारसिंग ठाकुर , शहर प्रमुख संतोष पुदाले , रिपाइंचे नेते राजेंद्र शिंदे , महादेव कांबळे अरविंद लोखडे ,भैय्या रणे , आदिजन उपस्थित होते






